Yerawada Pune Crime News | भररस्त्यात तरुणीसोबत असभ्य वर्तन, येरवडा परिसरातील घटना

पुणे : – Yerawada Pune Crime News | रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणींसोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग (Molestation Case) करण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून शहरात वाढत आहेत. कल्याणीनगर ते शास्त्रीनगर चौकाकडे (Kalyaninagar to Shastrinagar Chowk) जाणाऱ्या तरुणीसोबत अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.19) रात्री अकराच्या सुमारास एच.एस.बी.सी ऑफिस समोर घडली आहे.
याबाबत 25 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.20) येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन एका अनोळखी व्यक्तीवर आयपीसी 354, 337 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांची बहिण व मैत्रिण कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण करुन घरी परत जात असताना एच.एस.बी.सी ऑफिस समोर एका अनोळखी व्यक्तीने पाठीमागून येऊन असभ्य वर्तन करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन
पुणे : घरासमोर भांडी घासत असलेल्या अल्पवयीन मुलीला घरामध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केला. पिडीत मुलीने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.20) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. यावरुन समित भिमराव गायकवाड (वय-19 रा. बालेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Comments are closed.