नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानी सरकार आता सिनेमा पाहून भारतासोबत स्मार्ट वॉरची तयारी करत आहे. पाक सरकारने सिनेमा पाहून ट्रीक घेतली आहे की, युद्ध कसं लढवलं जावं. जेणे करून भारतातील मुसलमानांचे नुकसान होणार नाही. पाकिस्तान अशा स्मार्ट बॉम्बचा वापर करेल जो फक्त हिंदूंना मारेल मुसलमानांना नाही. हे वक्तव्य कोणी मानिसक रुग्णाने नाही तर पाकच्या रेल्वे मंत्र्यांनी केलं आहे.
पाकचे रेल्वे मंत्री शेख राशिद आपल्या विचित्र वक्तव्यांसाठी जगात फेमस आहेत. त्यांच्या काही मुर्खपणाच्या वक्तव्यांनी पूर्ण जगात त्यांची चर्चा सुरु आहे. त्यांनी पाकिस्तानला जगातील अनेक मंचावर लज्जास्पद वाटेल अशी वक्तव्ये केली आहेत. सध्या त्यांचा एक इंटरव्ह्यू सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.
पाकिस्तानातील एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मुर्खपणाचं गाठोडं खोललं आहे. याचा काही भाग सोशलवर व्हायरल होत आहे. ज्यात ते म्हणत आहेत की, “आयएसबीआरचा एक सिनेमा मी पूर्ण पाहिला आहे. आमच्याकडे अॅटोमिक वॉरशिवाय काहीच पर्याय नाही. याला स्मार्ट वॉरही म्हणू शकता. तिथे मुसलमानही आहेत. आपले विचार टारगेटेड असावेत. आपण जास्त वेपन्स वापरू शकत नाहीत. जर कोणी पाकिस्तानच्या सीमेपर्यंत पोहोचत असेल तर आपल्याकडे असे स्मार्ट बॉम्ब असावेत जे फक्त त्या एरियाला टार्गेट करेल.”
https://www.youtube.com/watch?
पाकचे रेल्वे मंत्री प्रेस क्लबकडून बॅन
शेख राशिद म्हणतात की, “पाकिस्तानकडे असे स्मार्ट बॉम्ब आहेत जे मुसलमानांचं नुकसान करणार नाही. पाकिस्तानचे स्मार्ट बॉम्ब फक्त एका भागाला टार्गेट करून सोडले जातील.” यानंतर पाकच्या नॅशनल प्रेस क्लबने त्यांना बॅन केलं आहे. पाकच्या प्रेस क्लबने इस्लामाबाद आणि रावलपिंडीच्या आपल्या कार्यालयात शेख राशिद यांना घुसण्यास बंदी घातली आहे.
केवळ पाकंच नाही तर पूर्ण जगात शेख राशिद यांची थू थू होत आहे. शेख राशीद यांच्या कारस्थानाची चर्चा पाकिस्तानी सोशल मीडियावरही होत आहे.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत