औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – मोदी साकारणं आता महिला बचत गटांच्या महिलांबाबत महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. शेंद्रा येथील विकासकामांच्या उदघाटनावेळी मोदी यांनी सांगितले कि, ‘आता बचत गटातील प्रत्येक महिलेला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच रोजगाराचा विस्तार करण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत एक लाखाचं कर्ज देण्यात येईल. तसेच जनधन खातं असलेल्या महिलांना खात्यात पैसे नसले तरी ५ हजार रुपयांचं कर्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. अशी मोदी यांनी घोषणा केली.
Addressing a Mahila Sammelan in Aurangabad. Watch. https://t.co/rkmofHdHZY
— Narendra Modi (@narendramodi) September 7, 2019
पंतप्रधान मोदी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. यावेळी शेंद्रा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑरिक सिटीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. मोदी बोलताना म्हणले कि, ‘सर्वप्रथम सर्व माताभगिनींना माझा नमस्कार.सणासुदीचे दिवस असतानासुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात याबद्दल खूप खूप आभारी आहे. आज आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती सुद्धा आहे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो, अशी मराठीतुन त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. ऑरिस सिटीच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये अनेक कंपन्या येतील. ज्यामुळे मराठवाड्यातील तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे,
ज्येष्ठ समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांनी ७०च्या दशकात संसदेत सांगितलं होतं कि, शौचालय आणि पाणी या महिलांच्या दोन प्रमुख समस्या आहेत. या समस्या सोडवल्या तर देशाच्या प्रगतीत महिलांचाही हातभार लागेल. लोहिया गेले. त्यानंतर अनेक सरकारे आली आणि गेली. पण या समस्याच निराकारण कुणीही केलं नाही. पण आम्ही सत्तेत येताच या समस्या सोडवण्यावर भर दिला असल्याचं मोदी म्हणाले. दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने पाण्यासाठी नवीन मंत्रालय सुरू केलं असून पाण्यासाठी साडे तीन लाख कोटी रुपये खर्च केला आहे. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि महिला व बालककल्याण मंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते.
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत