बहुजननामा ऑनलाईन – दररोजच्या व्यवहारासाठी पैसे नसणाऱ्या कर्जबाजारी पाकिस्तानच्या सैन्याबाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका संशोधनातून ही बाब स्पष्ट झाली आहे की, भारताला वारंवार युद्धाच्या धमक्या देणाऱ्या कर्जबाजारी पाकिस्तानी सैन्याकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी अर्ध्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. तसेच पाकिस्तानातील एकूण संपत्तीपैकी ५६ टक्के संपत्ती पाकिस्तानी जनरलांनी गिळंकृत केली आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याकडे असणारी संपत्ती भारतीय रुपयाच्या किमतीनुसार ९ कोटींपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी सरकार देश चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थाकडे भीक मागताना दिसत आहे. भारत पाकिस्तानी संबंधावर राज्यसभेचे खासदार आर. के सिन्हा लिखित बेलगाम लपेट पुस्तकात पाकिस्तानचा उल्लेख भ्रष्ट आर्मी, काळाबाजारी, तस्कर आणि दहशदवादी असा करण्यात आला आहे.
पाकिस्तानी सुरक्षा तज्ज्ञ डॉ. आयेसा सिद्दीकी लिखित इनसाइड पाकिस्तानी मिलिट्री इकॉनॉमी पुस्तकातदेखील पाकिस्तानी सैन्याच्या श्रीमंतीचे वर्णन करण्यात आले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनावेळीदेखील खुप गोंधळ झाला होता. सिद्दीकी यांनी पाकिस्तानी सैन्याकडे भारतीय रुपयांच्या किमतीनुसार नऊ हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा उल्लेख या पुस्तकात केला आहे. ही संपत्ती पाकिस्तानात येणाऱ्या थेट आंतरराष्ट्रीय गुंतवणूकीच्या तुलनेने ४ टक्के जास्त आहे.
काही वर्षीपुर्वी फौजी फाऊंडेशनने एक साखर कारखाना अगदी कमी किमतीत एका आर्मी ऑफिसरला विकला होता. तर पाकिस्तानातील १२ टक्के सुपीक जमीनीवर पाकिस्तानी सैन्याने कबजा करुन ठेवला आहे. यातील दोन तृतियांश जमीनी तर सेनेच्या माजी अधिकाऱ्यांना भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. यापेक्षाही धक्कादायक बाब अशी की, पाकिस्तानातीन शंभर सेनाधिकाऱ्यांची संपत्तीची किंमत २७१ कोटी रुपये इतकी आहे. यावरुन स्पष्ट होते की, पाकिस्तानी सरकार लाचार असू त्याचे भोग तेथील गरीब जनतेला भोगावे लागत आहेत.
पाकिस्तानातील माध्यमाच्या अहवालानुसार तेथील पन्नास मोठ्या कंपन्या पाकिस्तानी सेनेच्या नावावर आहेत. तेथील सर्वात मोठे उद्योगही सैनेच्या नावाने सुरु आहेत. तर पाकिस्तानी फौजी फाउंडेशन २५ कंपन्या चालवत आहेत. या कंपन्याचे संचालकही सैन्याचे माजी अधिकारी असून त्यांची संपत्तीची भुक दिवसेंदिंवस वाढत आहेत. याबाबतीत पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयनानेही प्रश्न उपस्थित केले आहेत.
- विषयक वृत्त आरोग्यदात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत