बहुजननामा ऑनलाइन – जिल्हयातील खेडचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश नामदेवराव गोरे यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. ते 55 वर्षाचे होते. काही दिवसांपुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर गेल्या एक महिन्यापासून पुण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार चालू होते. अखेर आज त्यांनी रूग्णालयातच अखेरचा श्वास घेतला आहे.
सुरेश गोरे यांनी यापुर्वी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलं होतं. ते चाकण जिल्हा परिषद गटाचे सदस्य होते. सन 2014 मध्ये त्यांनी आळंदी विधानसभा मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणूकीत त्यांचा विजय झाला होता. सन 2014 ते 2019 दरम्यान ते आमदार होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते खंदे समर्थक होते. सन 2009 मध्ये त्यांना राष्ट्रवादीनं त्यांना खेडची उमेदवारी दिली होती. मात्र, ती रद्द करण्यात आली. त्यानंतर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि ते निवडणूकीत विजयी देखील झाले. आज त्यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे.