बहुजननामा ऑनलाईन टीम : ओडिशामधील काँग्रेसचे नेते प्रदीप मांझी यांचा एक विडिओ सध्या समोर आला आहे. या विडिओमध्ये ते फोनवर बोलत असून त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पेट्रोल आणि डिझेल तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत.ओडिशामधील नंबरंगपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली म्हणून तेथील परिसरात काँग्रेसकडून १२ तास बंद ठेवण्यात आला होता.
"Keep petrol & diesel ready. The moment you get an order, set everything on fire."#Odisha Congress leader Pradip Majhi caught on cam directing protesters to go on rampage in Nabarangpur over alleged gang rape & murder of a minor girl in Kosagumuda PS area #Watch pic.twitter.com/nSgjClQlMs
— OTV (@otvnews) December 26, 2019
त्यानंतर मांझी यांनी फोनवर कार्यकर्त्यांना आग लावण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल तयार ठेवा. काही वृत्तवाहिन्यांचा कॅमेऱ्यामध्ये त्यांचे हे वादग्रस्त विधान कैद झाले आहे. हा विडिओ अनेक ठिकाणी व्हायरलही झाला आहे. देशात अनेक ठिकाणी बलात्कार होत असताना सरकार अजूनही कोणते ठोस निर्णय घेत नाही.
असे सतत बलात्कार होत असताना आम्ही शांत राहू शकत नाही. महात्मा गांधींजींच्या तत्वांमुळे जेव्हा गरीब जनतेला न्याय मिळत नाही, तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा अवलंब करण्यास भाग पडते, असे प्रदीप मांझी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
Visit : bahujannama.com