नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कुशल पंजाबीने वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या करुन आपले आयुष्य संपवले. त्याच्या मृत्यूमुळे टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी कुशलच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट सापडली आहे. पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी कुशलने लिहलेल्या सुसाईड नोटबद्दलचा तपशील शेअर केलेत.
परमजीत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आत्महत्येचे प्रकरण आहे. कुशलचे आईवडील दुपारपासून कुशलला संपर्क करत होते. पण कुशलचा फोन बंद लागत होता. रात्र झाली तरी कुशलशी संपर्क होत नव्हता. कुशलचे आईवडिल रात्री साडेदहाच्या सुमारास तो रहात असलेल्या बिल्डींगमध्ये गेले. त्यावेळी कुशल घरात एकटा होता. त्यामुळे आईवडिलांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी कुशलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कुशलने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. या सुसाईड नोटमध्ये त्याने आत्महत्येसाठी कोणलाही जबाबदार ठरवू नये, असे लिहले आहे.
कुशल आर्थिक संकटात होता. त्याच्याकडे काम नव्हते. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे त्याला नैराश्य आले असावे. यातूनच त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा सध्या सुरु आहे. कुशलने नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपियन गर्लफ्रेंन्ड Audrey Dolhen सोबत लग्न केले होते. दोघांना एक मुलगा आहे. कुशलचे मुलावर प्रचंड प्रेम होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. इन्टा स्टोरीवर त्यांने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. हीच पोस्ट त्याची शेवटची होती.
Visit : bahujannama.com