बहुजननामा ऑनलाइन टीम – कौन बनेगा करोडपतीचा सीझन 12 (KBC 12)खुप चांगल्याप्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता शो एका रोमांचक वळणावर येऊन उभा आहे. स्पर्धक नाझिया नसीम या सीझनची पहिली करोडपती स्पर्धक बनली आहे.
निर्मात्यांकडून शोचा एक प्रोमो रिलिज करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, नाझियाने एक कोटीच्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले आहे. अमिताभ सुद्धा पूर्ण उत्साहाने घोषणा करत आहेत की, त्यांनी एक कोटी रूपये तुमच्या नावावर केले आहेत.
प्रोमोत दिसत आहे की, अमिताभ, नाझियाच्या समोर सात कोटींच्या जॅकपॉटचा प्रश्न सुद्धा ठेवणार आहेत. जर स्पर्धाकाने त्या प्रश्नाचे सुद्धा बरोबर उत्तर दिले तर ती इतिहास रचणार आहे.
परंतु, नेहमीप्रमाणे अमिताभ बच्चन, नाझियाला सावध करत आहेत. ते तिला विचारपूर्वक खेळण्याचा सल्ला देत आहेत. आता आत्मविश्वासाने परिपूर्ण असणारी नाझिया म्हणते की, ती नेहमीच रिस्क घेत आली आहे, अशात ती आताही रिस्क घेईल हे स्पष्ट आहे. म्हणजे नाझिया 7 कोटींचा जॅकपॉट प्रश्न खेळण्यासाठी तयार आहे. ती बहुतेक क्विट करणार नाही.
सोशल मीडियावर केबीसीचा हा प्रोमो वेगाने वायरल झाला आहे. प्रेक्षक हा एपिसोड पहाण्यासाठी उतावीळ झाले आहेत. हा स्पेशल एपिसोड 11 नोव्हेंबरला 9 वाजता टेलीकास्ट होईल.
सीझन 12 बाबत बोलायचे तर नाझियाच्या अगोदर छवि कुमारने सुद्धा एक कोटी रूपयांपर्यंतचा प्रवास केला होता. विंग कमांडरच्या या हुशार पत्नीने गेम दाखवत 50 लाख रूपये आपल्या नावावर केले होते. त्यांनी एक कोटीच्या प्रश्नावर गेम सोडला होता.