नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेत सध्या बेकायदा हालचाली प्रतिबंधक सुधारणा विधेयकावरून कॉंग्रेस आणि भाजपध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपने दहशतवादाला आळा घालण्यासाठी सुधारणा विधेयक आणल्याचा दावा केला आहे. तर त्यावरून कपील सिब्बल यांनी अमित शहा यांना लक्ष्य करत थेट आव्हानच दिले आहे. हिंमत असेल तर नथुराम गोडसेला दहशतवादी म्हणून दाखवा असं आव्हानच त्यांनी अमित शहांना दिले आहे.
दहशतवादी घोषित करण्यात आल्यास संबंधित व्यक्तीला अपील करता येते किंवा लवादाकडे दाद मागू शकते. असा उल्लेख विधेयकात आहे. परंतु त्या व्यक्तीला केव्हा आणि का दहशतवादी म्हणून घोषित केलं जाणार याचा उल्लेख त्यात केलेला नाही. एफआयआरनंतर संबंधित व्यक्तीला दहशतवादी ठरविणार की आरोपपत्र दाखल केल्यानंतर की संपुर्ण सुनावणीनंतर यावर विधेयकात कोणतीही माहिती नसल्याचे सिब्बल म्हणाले.
आपल्या कायद्यानुसार एखाद्यावर गुन्हा सिद्ध होईपर्यत ती व्यक्ती निर्दोष असते. मग तुम्ही सुनावणी सुरु असतानाच एखाद्याला दहशतवादी कसं काय ठरवू शकता. असा प्रश्न त्यांनी विचारला. संबंधित व्यक्ती ही तुमच्या दृष्टिकोनातून दहशतवादी आहे की नाही हे ठरतं. असं म्हणत हाफिज सईद आणि नथुराम गोडसेची तुलना करत गोडसे दहशतवादी आहे. परंतु ते बोलण्याची हिंमत तुम्चायत नाही. १९४७ पासून तशी हिंमत तुम्ही दाखवली नाही. तुमच्यात हिंमत असेल तर गोडसेला दहशतवादी म्हणून दाखवा असं थेट आव्हान सिब्बल यांनी दिलं. तर एखादयाला दहशतवादी ठरविताना तुमचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. असे सिब्बल म्हणाले.