बहुजननामा ऑनलाइन टीम – कर्नाटकच्या प्रमुख सचिव आयपीएस डी. रूपा (IPS officer D Roopa ) पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. ट्विटवर (#ShameOnYouIPSRoopa) ट्रेंड होत आहे. नेटकरी डी. रूपा यांना ट्रोल करत आहेत. अशात अभिनेत्री कंगना रणौत (kangana-ranaut) हिनेदेखील उडी घेऊन रूपा यांना लक्ष्य केले आहे. आता हे नेमके काय प्रकरण ते जाणून घेऊया.
ट्विटर या सोशल मीडियावरील हिंदू संस्कृतीबाबत माहिती देणारे ‘True Indology नावाचे अकाउंट आहे. आयपीएस डी. रूपा आणि ‘True Indology’ यांच्यात दिवाळीत फटाक्यांवरील बंदीवरून वाद झाला होता. रूपा यांनी या पेजवर लोकांना भ्रमित करण्याचा आरोप केला होता. त्यानंतर ट्विटरने ‘True Indology चे अकाउंट सस्पेंड केले. अकाउंट ट्विटरने सस्पेंड करताच लोक भडकले होते. डी. रूपा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. रूपा यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर लावला. आता कंगना रणौतने डी. रूपा यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले आहे.
https://twitter.com/KanganaTeam/status/1328922920991690752?ref_src
असे अधिकारी पोलिसांत असणे लज्जास्पद : कंगना
डी. रूपा आणि True Indology यांच्या वादात कंगनाने उडी घेत एक ट्विट केले. ट्विटमध्ये तिने डी. रूपा यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. आरक्षणाचे दुष्परिणाम. अपात्र व्यक्तीला पॉवर मिळतो, तेव्हा ती व्यक्ती जखमा भरत नाही तर त्या जखमावरची खपली काढण्याचे काम करते. मला त्यांच्या (डी. रूपा) खासगी आयुष्याबद्दल काहीही माहीत नाही. पण मी गॅरंटीसह म्हणते की, त्यांचे नैराश्य त्यांच्या अकार्यक्षमतेतून जन्मले आहे, असे ट्विट कंगनाने केले. त्यानंतर दुस-या ट्विटमध्ये कंगनाने डी. रूपा यांना निलंबित करण्याची मागणीही केली. डी. रूपा यांना निलंबित करायला हवे. असे अधिकारी पोलिसांत असणे लज्जास्पद असल्याचेही कंगनाने म्हटले आहे.
डी. रूपा आहे तरी कोण
https://twitter.com/KanganaTeam/status/1329029855208296448?ref_src
कर्नाटक कॅडरच्या 2000 बॅचच्या डी. रूपा या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना ‘लेडी सिंघम’ म्हणूनही त्यांची ओळख आहे. 2004 मध्ये त्या अचानक चर्चेत आल्या होत्या. 1994 च्या हुबळी दंगली प्रकरणी मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांना त्या अटक करण्यासाठी पोहोचल्या होत्या. तीन वर्षांपूर्वी डी. रूपा यांनी अण्णाद्रमुक नेत्या शशिकला यांना कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली होती. सोशल मीडियावर परखड मत मांडण्यासाठीही त्या ओळखल्या जातात. आपल्या या परखड व दबंग स्वभावामुळे त्यांची आत्तापर्यंत 41वेळा करण्यात आली आहे.