नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूत केसवरून सतत वक्तव्य सुरू आहेत आणि या प्रकरणात कंगना राणावत सतत काही ना काही बोलत आहे. कंगना आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात चांगलाच कलगी-तुरा रंगला आहे. कंगनाने पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
तिने एका ट्विटला रिट्विट केले, ज्यामध्ये लिहिले होते, जेव्हा दिपिका पडुकोणला एका छोट्या-मोठ्या भाजपा नेत्याने धमकावले होते, तेव्हा संपूर्ण लिब्रल गँग मोदीजींच्या विरूद्ध उभी होती आणि भारत असुरक्षित असल्याचे म्हटले होते, परंतु जेव्हा कंगना आपण असुरक्षित असल्याचे बोलते तेव्हा हे कंगना व्हर्सेस मुंबई होते. यांच्यात लाज शिल्लक आहे का?
कंगनाने म्हटले आहे, मी एका मीडल क्लास फॅमिलीतून आहे, माझे पालक फॅन्सी नाहीत, आम्ही सामान्य लोक आहोत, सुशांत प्रमाणेच, माझ्या रक्तात अॅवॉर्ड वापसी आणि कँडल मार्च गँगसाठी काहीही व्हॅल्यू नाही. ते कधीही आमच्यासाठी बोलणार नाहीत. शेम ऑन संजय राऊत.
यापूर्वी सुद्धा कंगना राणावतने आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांच्यावर निशाना साधताना म्हटले होते की, संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आहे आणि म्हटले आहे की, मुंबईत परत येऊ नको. अगोदर मुंबईच्या रस्त्यावर स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या गेल्या आणि आता उघड धमकी मिळत आहे. ही मुंबई पाकिस्तान अधिकृत काश्मीरसारखी का वाटत आहे?