जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – जळगावमध्ये भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बैठकीत चांगलाच गोंधळ झाला आहे. विशेष म्हणजे रावसाहेब दानवे आणि गिरीज महाजन यांच्यासमोरच हा राडा झाला. भुसावळ अध्यक्षपदाच्या निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचे समजत आहे. यावेळी भाजपचे इतरही वरिष्ठ नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा सरचिटणीसांच्या तोंडावर शाई फेकली.
VIDEO: दानवे-महाजनांसमोर भाजप कार्यकर्त्यांचा मोठा राडा, शाई फेकत केली घोषणाबाजी@BJP4Maharashtra @girishdmahajan @ShivSena @rautsanjay61 pic.twitter.com/DJiQytCFWq
— Renuka Dhaybar (@renu96dhaybar) January 10, 2020
आज जळगावमध्ये भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड होत होती. या निमित्त भाजपची एक बैठक होती. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर भुसावळच्या भाजप कार्यकर्त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेतली आणि दानवे व महाजनांना सांगितलं की, भुसावळमधील शहराध्यक्ष म्हणून जी दिनेश नेमाडे यांची निवड झाली आहे ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे. निष्ठावंतांना डावलून भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांनी आपला मनमानी कारभार केला आहे. याचाच कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी त्यांनी व्यासपीठावर शाई फेकली. सुनील नेवे यांच्या तोंडालाही शाई लावण्यात आली.
या घटनेनंतर रावसाहेब दानवे व्यासपीठ सोडून बाहेर गेले. भुसावळमधील शहराध्यक्ष दिनेश नेमाडे यांनी सर्वांना विश्वासात न घेता निवड केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांमध्ये भलताच गोंधळ झाल्याचं दिसत आहे. त्यांना आवरताना नेत्यांना नाकीनव आले. या गोंधळादरम्यान दानवे व्यासपीठावरून निघून गेल्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्तांना शांत करण्याचा प्रयत्न करूनही कार्यकर्ते ऐकत नव्हते. त्यांच्यातील तुफान राडा सुरूच होता. यावेळी अनेक भाजप कार्यकर्त्यांकडून शाईफेक होताना दिसली. यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला.
Visit : bahujannama.com