भोपाळ : वृत्तसंस्था – जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याविरुद्ध देशभरात निदर्शेने चालू आहेत. तसेच अनेक बॉलीवूड कलाकार या हल्ल्याविरुद्ध जेएनयूमधील विद्यार्थ्यांसोबत उभे आहेत. दीपिका पदुकोननेही जेएनयूमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्या भेटीवर अनेक भाजपचे नेते आणि त्यांच्या समर्थकांनी दीपिकाला ट्रोल केले आहे. सोबतच आज दीपिकाचा ‘छपाक’ तर अजय देवगणचा ‘तानाजी’ असे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. परंतु दीपिकाने जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतल्यामुळे काही संघटनांकडून तिच्या चित्रपटाचा विरोध केला जात आहे.
तसेच दीपिकाच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मोहीम राबविली आहे असून सोशल मीडियावर तिच्यावर टीकास्त्र सोडले आहे. दीपिकाच्या चित्रपटावर होणारा बहिष्कार जाणून बुजून केला जात आहे तर दुसरीकडे अजय देवगणच्या ‘तानाजी’चे प्रमोशन केले जात आहे. पण अशाने चित्रपट प्रदर्शनांमध्येही राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे.
उत्तर प्रदेशचे अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना ‘छपाक’ चित्रपट दाखवण्यासाठी चित्रपटगृहच बुक केले आहे. एकीकडे मध्य प्रदेशमध्ये युवक काँग्रेसकडून ‘छपाक’ची तिकिटे मोफत वाटली असून दीपिकाच्या समर्थनार्थ हे सर्व सुरु असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते अजय देवगणच्या ‘तानाजी’ चित्रपटाची तिकिटे फ्री मध्ये वाटली जात आहेत. ‘तानाजी’ हिट ठरावा तर ‘छपाक’ फ्लॉप व्हावा या उद्देशाने भाजपच्या समर्थकांनी ‘तानाजी’ चित्रपटाची तिकिटे मोफत वाटली आहेत. परंतु राजकारणातील या वादामुळे सामान्य व्यक्तींना मात्र फायदा होत आहे.