पुणे : बहुजननामा ऑनलाईन – खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सारथी संस्थेच्या बाहेर उपोषणसासाठी बसणार असल्याची घोषणा केली होती. शनिवार ११ जानेवारी रोजी ते मराठा समाजातील मुलांसाठी काम करणारी संस्था वाचवण्यासाठी उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
त्यांच्या या आंदोलनाबाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले कि सारथी संस्थेबाबत दोन बाजू समोर येत आहेत. या संस्थेत भ्रष्टाचार झाला असेल, तर कुणाचीही गय केली जाणार नाही. संभाजी राजेंनी उपोषण करू नये, असे सांगितले. तसेच या प्रकरणाबाबत सचिवांसह चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
या बैठकीसाठी संभाजीराजे देखील उपस्थित असतील,असेही त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक उद्या होणार असून आज पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराची मुलाखत घेऊन झाल्यावर पवार यांचे प्रसार माध्यमांशी बोलणे झाले.
Visit : bahujannama.com