नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानसाठी अजून एक वाईट बातमी असून २०२० मध्ये भारतीय पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये दोन स्थानांनी घसरून ८४ व्या स्थानावरआला आहे. भारतीय पासपोर्ट ज्यांच्याकडे आहे ते ५८ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश करू शकणार असल्याची माहिती एका नवीन अहवालात समोर आली आहे. सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत जपान पहिल्या स्थानी असून सर्वात मागे असलेल्या पासपोर्टच्या यादीत पाकिस्तान चौथ्या स्थानी आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक आणि सीरियामध्ये दहशतवादी कारवाया सुरु असून ही इस्लामिक राष्ट्र आहेत. तर अमेरिका, जर्मनी, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूरसारखे देश इस्लामिक देशात राहणाऱ्या नागरिकांना व्हिसा देण्यास डगमगत आहेत. य देशांमधील दहशतवादी कारवायांविषयी काहीही ऐकायला मिळत नसून दहशतीमुळे या देशातील पासपोर्ट रँकही कमी असल्याचे दिसत आहे.
इंटरनॅशनल एयर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, हेनली अँड पार्टनर्सने पासपोर्ट इंडेक्स जाहीर केला असून त्यात पासपोर्ट असणारे किती देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळू शकते, या आधारावर रँकिंग केली आहे. भारतीय पासपोर्ट असणारे भूतान, कंबोडिया, इंडोनेशिया, मकाऊ, मालदीव, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, थायलंड, केनिया, मॉरिशस, सेशेल्स, झिम्बाब्वे, युगांडा, इराण आणि कतार या ५८ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. तसेच काही देशांना व्हिसा-ऑन अरायव्हलची गरज पडू शकते.
Visit : bahujannama.com