नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान 2 चा लँडर विक्रमबाबत मोठी माहिती समोर आली आहे. त्यावरून समजत आहे की विक्रम लँडर सुरक्षित आहे. लँडरची कोणतीही तोडफोड झालेली नाही असे समजत आहे. इस्रोच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, लँडर विक्रमसोबत संपर्क साधण्याचा प्रत्येक शक्य तो प्रयत्न केला जात आहे.
विक्रमशी संपर्क तुटला
इस्रोच्या चांद्रयान 2 चा चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करण्याच्या काही वेळ आधीच संपर्क तुटला होता. इस्रोने याची माहिती देत म्हटले होते की, 2.1 किलोमीटर आधीच चांद्रयान 2 सोबतचा संपर्क तुटला आहे. ज्याच्यामुळे पुढे कोणतीही माहिती मिळाली नव्हती.
कसा तुटला संपर्क ?
महत्त्वाकांक्षी मिशन चांद्रयान 2 शुक्रवारी रात्री उशीरा चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2.1 किलोमीटर दूर असतानाच रस्ता भटकलं. याची शंका आधीच व्यक्त केली गेली होती. विक्रम लँडरचे चंद्रावर पोचण्याचे 15 मिनिट खूपच महत्त्वाचे असतील असे सांगण्यात आले होते. रात्री 1 वाजून 38 मिनिटांनी विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर आणण्याची प्रक्रिया सुरु केली गेली. परंतु चंद्राच्या पृष्ठभागावर पोचण्याच्या 2.1 किमीआधीच त्याचा इस्रोशी संपर्क तुटला होता. तेव्हापासूनच विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ऑर्बिटरने शोधले होते विक्रम लँडरचे लोकेशन
दरम्यान रविवारी ऑर्बिटरने लँडर विक्रमचे लोकेशन शोधले होते. यानंतर लँडर विक्रमसोबत संपर्क होण्याच्या अपेक्षा वाढल्या होत्या. अर्थात शास्त्रज्ञांसाठी हे सोप नव्हतं. वेळ जात होता तसा लँडर विक्रमसोबत संपर्क ढील्ला होत होता. इस्रो प्रमुख के सिवन यांनी शनिवारी म्हटलं होतं की, अंतराळ संस्था 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल.”