बहुजननामा ऑनलाईन – जगातील सर्वात तुफान नेमबाज आणि शुटर दादी या नावाने प्रसिद्ध असलेली चंद्रो तोमर (८७) गेल्या पाच दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर शुक्रवारी यशस्वी रित्या ऑपरेशन करण्यात आले. आता त्यांना लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
चंद्रो तोमरवर नुकताच शुटिंगच्यावेळी माकडांनी हल्ला केला होता. यादरम्यान, त्यांनी स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात त्या खुर्चीवरून खाली पडल्या आणि त्यांच्या उजव्या पायाला लागल्याने पायाला फ्रॅक्चर करावे लागले. यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान त्यांच्यावर हाडांची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण झाली असून आता त्यांना लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.
चंद्रो तोमर या मूळच्या बागपत जिल्ह्यातील जोहरी गावातील रहिवासी आहे. त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी शूटिंग सुरु केले. त्यांनी नेमबाजीत २५ राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकले आहेत. यामुळे त्यांना लोक ‘शुटर दादी’ आणि ‘रिव्हॉल्व्हर दादी’ म्हणून ओळखतात. इतकेच नाही तर नेमबाज दादीवरील ‘सांड़ की आंख’ हा चित्रपट येत्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे.