बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात किमान सुमारे ९० कुत्री मृत आढळूल आली आहे. बुलढाण्यातील वनपरिक्षेत्रातील गिरडा-सावळदबारा रोडवर गुरुवारी (ता.५) अनेक ठिकाणी कुत्र्यांचे मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत सापडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार,लढाण्यातील वनपरिक्षेत्रातील गिरडा-सावळदबारा रोडवर गुरुवारी (ता.५) अनेक ठिकाणी कुत्र्यांचे मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत सापडले.
तोंड व पाय बांधलेल्या अवस्थेतील कुत्र्यांच्या मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यावर परिसरातील लोकांना कळाले. लोकांनी पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. घटनास्थळावर पोलिस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना काही कुत्रे जिवंत आढळले. वनरक्षकाच्या तक्रारीच्या बेवारस कुत्र्यांच्या हत्येविरोधात क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की पाच ठिकाणी शंभरहून अधिक कुत्री फेकण्यात आली होती.
त्यातील ९० कुत्रे मृतावस्थेत सापडले, तर त्यांच्यातील काही जिवंत होते. दरम्यान पोलीसांनी त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यांचे मृत्यूचे कारण उघड होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले की, शहरात बेवारस कुत्र्यांना पकडून त्यांना ठार मारण्यात आले आणि त्यानंतर त्यांना वनक्षेत्रात फेकण्यात आले. असा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात कुत्रा पकडणाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.