जेरूसालेम : वृत्तसंस्था – शाळा सुरु केल्यामुळे इस्त्रााईल देशाला मोठी किंमत मोजावी लागली आहे. कोरोनाव्हायरसची प्रकरणे कमी होताच या देशाने शाळा सुरू केल्या होत्या. त्यामुळे आता261 जण कोरोना संक्रमित झालेत. त्यामुळे 6 हजार 800 मुलांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. भारतातील काही राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र इज्राइलला हाच निर्णय महागात पडला आहे.
इज्राइलमध्ये मार्च महिन्यात कोरोनाची सर्वाधिक प्रकरणे समोर आली होती. एप्रिलमध्ये ही प्रकरणे झपाट्याने वाढू लागली. त्यावेळी इज्राइलने टेस्टिंगसह लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. 30 एप्रिलला देशात 15 हजार 946 कोरोना रुग्ण होते. पुढील 15 दिवसात फक्त 600 प्रकरणे आली. त्यामुळे सरकारने उत्साहाने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू केल्या. त्यानंतर शाळा सुरू करताच देशातील कोरोनाची प्रकरणे वेगाने वाढली आहेत., इज्रायलच्या शाळेतील 261 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली.
शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 261 कोरोना संक्रमितांमध्ये 250 मुले आहेत. त्यानंतर 6 हजार 800 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 17 हजार 377 वर पोहोचली आहे. अचानक प्रकरणे वाढल्यामुळे इज्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शाळा अनिश्चित काळापर्यंत बंद करण्याचे आदेश दिलेत. जोपर्यंत शाळेतील मुले आणि कर्मचारी पूर्णपणे कोरोनामुक्त होत नाहीत तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत, असेही पंतप्रधानांनी सांगितले आहे.