मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – प्रसिद्ध सिंगर आणि कंपोजर वाजिद खानचं निधन झालं आहे. वाजिद खान किडनीच्या आजारानं ग्रस्त होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. रविवारी (दि 31 मे) त्याची तब्येत अचानक बिघडल्यानंतर त्याला चेंबूरच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी (दि 1 जून) त्याच्या निधनाची बामती समोर आली. त्याला कोरोनाही झाला होता. अशातच आता अशी बातमी समोर आली आहे की, वाजिदच्या आईलाही कोरोनाची लागण झाली आहे. चेंबूरच्या त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जिथे वाजिदनं अखेरचा श्वास घेतला होता.
समोर आलेल्या माहितीनुसार, वाजिदची आई रजिया खान यांना वाजिदच्या आधीच कोरोनाची लागण झाली होती. गायिका ममता शर्मा ज्यांनी साजिद वाजिदसोबत सलमानच्या दबंग 2 सिनेमात सर्वात हिट गाणं फेविकॉल से गायलं होतं त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितलं होतं की, मुलाच्या देखभालीसाठी ती हॉस्पिटलमध्ये थांबली होती. इथंत ती संक्रमित झाली. वाजिद आई आपल्या मुलाला शेवटचंही पाहू शकली नव्हती. त्यांना कोरोना झाला आहे म्हणून डॉक्टरांनी त्यांना ही बातमी सांगण्यासाठी नकार दिला होता. कारण त्यांना जर हे कळलं असतं तर त्या स्वत:ला रोखू शकल्या नसत्या आणि त्यांनी त्याला पाहण्याचा प्रयत्न केला असता जे त्यांच्यासाठी आणि आसपासच्या लोकांसाठी खतरनाक ठरलं असतं.