नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिसेंबर महिना येत आहे , आणि जर आपण हिवाळी सुट्टीची योजना आखत असाल तर भारतीय रेल्वेने तिकिट बुकिंगच्या नियमात काही बदल केले आहेत. भारतीय रेल्वे तिकिट बुकिंगच्या सुविधेत सतत काम करत आहे. इंडियन रेलवे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) रेल्वेच्या तिकिटाचा सुधारण्यासाठी आपल्या वेबसाइटमध्ये देखील अनेक बदल केले आहेत.
नव्या बदलामध्ये आता मुख्यपृष्ठावर होम स्क्रीनवर ‘Train Ticket Search ‘ हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे पर्याय शोधणाऱ्या प्रवाशांना लॉग-इनची माहिती द्यावी लागणार नाही. IRCTC संकेतस्थळामध्ये बदल झाल्यानंतर आता ‘Book Your Ticket ‘ बॉक्स तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला असेल. ज्यामध्ये प्रवासाचा तपशील भरावा लागेल. यामध्ये आपल्याला बोर्डिंग स्टेशन आणि गंतव्य स्थानक निवडावे लागेल. तारीख निवडण्यासाठी एक पर्याय देखील असेल. सर्व माहिती भरल्यानंतर ‘Find Train ‘ या पर्यायावर क्लिक करा. ट्रेनविषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर लॉग इन करण्याची गरज भासणार नाही. परंतु , तिकिट बुक करताना लॉगिन करावे लागेल.
PNR स्टेट्स तपासणीसाठी पर्याय – पीएनआर स्टेटस पाहण्यासाठी ‘Book Your Ticket’ च्या खाली दिलेल्या पर्यायावर क्लिक करा. येथे ‘ PNR Status ‘ वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीएनआर क्रमांक भरावा लागेल आणि स्टेटस तपासण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा. ‘
सीट उपलब्धतेबद्दल माहिती – नव्या सुविधेअंतर्गत प्रवाशांना सीट उपलब्धताही लॉग इन केल्याशिवाय कळू शकते. IRCTC वेबसाइटवर ‘चार्ट्स / व्हॅकन्सी’ तपासण्याची सुविधा देखील आहे. यासाठी प्रवाशांना रेल्वे क्रमांक किंवा रेल्वेचे नाव द्यावे लागेल आणि बोर्डिंग स्टेशन निवडल्यानंतर त्यांना ‘Charts/Vaccancy’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर निवडलेल्या गाड्यांमध्ये जागेची उपलब्धता आहे की नाही हे आपणास कळेल.
या सर्व वैशिष्ट्यांसह आयआरसीटीसीने प्रतीक्षा यादी प्रवाश्यांसाठी एक पर्यायी योजनादेखील उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांना इतर गाड्यांमध्ये कन्फर्म सीट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.