नवी दिल्ली :वृत्तसंस्था – IRCTC | IRCTC ने गुजरात फिरणार्या पर्यटकांसाठी विशेष एयर पॅकेजची घोषणा (Announcement of special ‘Gujarat Air Package’ for tourists) केली आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) ऑफिशियल ट्विटर हँडलद्वारे ही माहिती दिली आहे. आयआरसीटीसीने म्हटले आहे की, ‘इनक्रेडिबल गुजरात तुम्हाला बोलावत आहे. येथील प्रमुख शहरांचा प्रवास करा आणि आतापर्यंतच्या सर्वात चांगल्या प्रेक्षणीय स्थळांवर सुट्टीची मजा घ्या.‘
आयआरसीटीसीकडून गुजरात प्रवासाचे हे पॅकेज 6 दिवस आणि 5 रात्रीचे ठेवण्यात आले आहे
(6 day and 5 night package of Gujarat trip) आणि या अंतर्गत तुम्हाला अहमदाबाद, वड़ोदरा, द्वारका, राजकोट आणि सोमनाथ या पाच शहरांचा प्रवास करता येईल.
या पॅकेजसाठी प्रतिव्यक्ती 24,360 रुपयांचे शुल्क ठरवले आहे.
सोबतच या पॅकेजमध्ये स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या प्रवासाचा सुद्धा समावेश आहे.
पॅकेजमध्ये काय-काय आहे
पॅकेजमध्ये रायपुर-अहमदाबाद-रायपुरचा विमान प्रवास आहे.
तसेच वडोदरामध्ये एक रात्र, राजकोटमध्ये 1 रात्र, सोमनाथमध्ये 1 रात्र आणि अहमदाबादमध्ये एक रात्र आरामाची व्यवस्था आहे.
सोबतच ब्रेकफास्ट आणि डिनरसह साइटसीनसाठी एसी गाड्यांची सुविधा सुद्धा आहे.
शिवाय ट्रॅव्हल इन्श्युरन्स आणि IRCTC’s Tour Escort services ची सुविधा सुद्धा प्रवाशांना दिली जाईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कधी आणि केव्हा सुरू होईल प्रवास
आयआरसीटीसीकडून या प्रवासाची सुरूवात गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला रायपुर एयरपोर्टवरून होईल. 21 दिवस अगोदर बुकींग कॅन्सल करू शकता.
मात्र 30 टक्के पैसे कापले जातील.
21 ते 15 दिवसांच्या आत 55 टक्के आणि 14 ते 8 दिवसांच्या आत पॅकेज रद्द केल्यास 80 टक्के पैसे कापले जातील. जर 8 दिवसात प्रवास कॅन्सल केला तर कोणताही रिफंड मिळणार नाही.
Web Title : irctc announces tour package for gujarat.
Rain In Maharashtra | पुढच्या 24 तासात ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 8 जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट
Pune Court | 118 कोटींच्या अपहार प्रकरणी व्यवसायिक संतोष दोशीचा जामिन फेटाळला, जाणून घ्या प्रकरण