मुंबई न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात आज (गुरुवार) 05 हजार 225 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 05 हजार 557 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62 लाख 14 हजार 921 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.93 टक्के झाला आहे. आज 154 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 35 हजार 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात (Coronavirus in Maharashtra) कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.11 टक्के आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यात सध्यात 57 हजार 579 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 17 लाख 14 हजार 950 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 64 लाख 11 हजार 570 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 03 लाख 29 हजार 047 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
https://twitter.com/PIBMumbai/status/1428364367934808076?s=20
पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 254 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 119 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 12 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 07.
– 206 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 491262.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2186.
– एकूण मृत्यू – 8868.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 480208.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9507.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 187 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 208 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 1 जणाचा मृत्यू
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 267763.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1159.
– एकूण मृत्यू – 4384.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 262446.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5323.
Web Title : Coronavirus in Maharashtra | 5,225 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state know other statistics
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 254 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
PM Modi | पीएम मोदी सध्या एकवेळ भोजन करत आहेत, स्वत:च सांगितले कारण; पहा व्हिडिओ