मुंबई :बहुजननामा ऑनलाईन – Rain In Maharashtra |जुलैमध्ये राज्यात मान्सूनने (Rain In Maharashtra) जोरदार हजरे लावली होती. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात मान्सूनने राज्यात दडी मारली. परंतु आता राज्यात मान्सून पुन्हा (Rain In Maharashtra) सक्रिय होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, पलघर, अहमदनगर, नाशिक, जलाना, औरंगाबाद, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात मध्यम ते तीव्र पावसाची (Rain) शक्यता आहे. तर मुंबईतही पुढच्या काही तासात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात अनेक जिल्हात पाऊस पडत आहे. गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातही पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पिक सुकू लागली आहेत. तसेच उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, वेळेवर पाऊस पडल्याने शेतकरी सुखावले असून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, राज्यात महापुराचा फटका बसल्यानंतर कोकणामध्ये (Konkan) पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी कोकणासह विदर्भ (Vidarbha) आणि मराठवाड्यात (Marathwada) चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आला आहे.
Web Title :- Rain In Maharashtra | maharashtra weather alert today heavy rainfall alert by imd to mumbai thane.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Court | 118 कोटींच्या अपहार प्रकरणी व्यवसायिक संतोष दोशीचा जामिन फेटाळला, जाणून घ्या प्रकरण
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 254 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी