उल्हासनगर : बहुजननामा ऑनलाईन – IPL Cricket Betting | इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०२१ मधील सामन्यांवर बेटिंग (IPL Cricket Betting) लावण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शनिवारीच बेटिंग करणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर एका मोबाईल अँपच्या सहाय्याने दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या दोघांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे.
यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सतरामदास जेसवानी (corporator satramdas jeswani) यांच्या मुलागा गिरीश याचाही समावेश असल्याचे समोर आले. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या (ulhasnagar police crime branch) अधिकाऱ्यांनी शनिवारी बेटिंग लावणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा एका मोबाइल अँपच्या सहाय्याने दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यावर बेटिंग सुरु असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकून दोघाना अटक केली. त्यामध्ये गिरीशचा सहभाग होता.
अटक करण्यात आलेले व्यक्ती हे क्रिकेट माझा या मोबाइल अँपच्या माध्यमातून बेटिंग (IPL Cricket Betting) करत होते. घटनास्थळावरुन पोलिसांनी मोबाइलसह इतरही काही सामान जप्त केले आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title : IPL Cricket Betting | ulhasnagar ncp corporator satramdas jeswani son girish arrested in betting on ipl 2021 dc vs csk match via mobile app.
Supreme Court | अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती ही सवलत आहे, अधिकार नव्हे – सर्वोच्च न्यायालय