नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – भारतीय स्वर्णकार समाजातर्फे येेथील चिटणीस पार्क येथे सामूहिक विवाह व समाज संमेलन उत्साहात पार पडले. या विवाह सोहळ्यात चार युगलांचा वैदिक पद्धतीने विवाह संपन्न झाला. नवयुगलांना महापौर नंदा जिचकार व नगरसेविका आभा पांडे यांनी आशीर्वाद दिले. या वेळी रामचंद्र येरपुडे यांच्या अध्यक्षतेत बी. सी. भरतिया, अनिलशेठ वाघाडकर, अशोक धाराशिवकर, वासू, राजनदास, मनसुखभाई सोनी, लक्ष्मीकांत सोनी, ओंकारेश्वर गुरव, भास्कर मैंद, अशोक मुंडगावकर, अशोक नगरकर, हरिओम सोनी, डॉ. प्रेमनारायण सोनी, शशिकला सोनी, माया हाडे, शालिनी काटोले, अंकिता सोनी, रितू जरगर, वैशाली डोमळे, छिंदवाडा महिला टीम, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर कार्यकारिणी मंडळाचा सत्कार विनायक करोले, वसंत मातने, किशोर काटोले, कृष्णराव चांबोळे, नरेश मस्के, तेजस ढोरे, रवी मस्के यांनी केला.
यावेळी महाराष्ट्र स्वर्णकार संस्था अध्यक्ष पुरुषोतम कावळे, सोना चांदी ओळ कमिटी सचिव राजेश रोकडे, ज्ञानेश्वर कुर्वे, ॲड. सुरेश आसरे, अनिल खरवडे, दत्तात्रय श्रीरंग आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक दीपक जरगर यांनी, तर संचालन रवी मस्के आणि विजय करंडे यांनी केले. यशस्वितेसाठी अमोल गुरव, प्रशांत खरवडे, शंकर खरवडे, रवी मस्के, तेजस ढोरे, रामदयाल सोनी, राकेश सोनी, शहर कार्यकारिणी युवक व महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले..