नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक बाजारात जोरदार विक्री, कच्च्या तेलाच्या भावात घट आणि कोरोना व्हायरसच्या आपत्तीमुळे भारतीय रुपया खाली आला आहे. गुरुवार आणि शुक्रवारनंतर आज सोमवारीही डॉलरच्या तुलनेत रुपयात रेकॉर्ड नोंदवला जात आहे. एका अहवालात रुपया सर्वात खराब प्रदर्शन करणाऱ्या आशियाई चलन असल्याचा करार दिला आहे. सोमवारी भारतीय रुपया प्रति डॉलर ७४.१६ पातळीवर घसरला आणि ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ७४.०८ वर होता.
मंदीची भीती –
देशांतर्गत इक्विटी मार्केटमध्ये मोठी घट आणि कोरोना व्हायरसच्या आपत्तीमुळे अर्थव्यवस्थेत मंदीच शंका पाहायला मिळत असून फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाच्या सुरुवातीला ७३.९९ च्या स्तरावर झाली आहे. यानंतर १६ पैसे घट होत ७४.०३ च्या स्तरावर घसरला. विदेशी बाजारात अमेरिकन चलनात कमकुवतपणा आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत हलका पाठिंबा दर्शवला आहे. पण ट्रेडर्सने मानणे आहे की, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेत मंदीची भीती भारतीय रुपयाची हालत आणखीच बिघडू शकते.
आधीच बाजारात लिक्विडिटीक अभाव –
मूडीज इन्व्हेस्टस्टर्सने आपल्या अहलावात म्हटले आहे की, भारतीय रिजर्व बँकेद्वारे रुपयावर लगाम लावण्यासाठी बाजारात उपलब्धता कडक करण्याचा निर्णय देशाच्या काही मोठ्या उद्धारकर्त्यांचे कर्ज आणि कर्जाने होणाऱ्या कमाईवर प्रभावित आहे.
इकरा (ICRA) रेटिंग एजन्सीचे कार्तिक श्रीनिवासन म्हणाले की, “प्रणालीमध्ये तरलता आधीपासूनच घट्ट आहे आणि यामुळे रुपया मजबूत करण्यासाठी आरबीआयच्या प्रयत्नातून बँकांवर दबाव येऊ शकतो.” तसेच बँकांच्या नफ्यावर परिणाम होईल आणि ठेवींमधून आणि उधारकर्त्यांच्या कर्जाच्या आणि होणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होईल.
आपल्या खिशावर काय परिणाम होईल?
एकाच वेळी दोन गोष्टी घडत असून एक म्हणजे रुपयाच्या मूल्यात घसरण. देशांकडून येणाऱ्या वस्तूंना जास्त किंमती द्याव्या लागतील. हीच परिस्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात आपल्या खिशावर प्रचंड दबाव येईल.
डॉलर वाढल्यावर महागाई किती वाढते?
अंदाजानुसार डॉलरच्या तुलनेत एक रुपयाच्या वाढीमुळे तेल कंपन्यांना ८ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यास भाग पडतात. पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतींमध्ये १० टक्के वाढ झाल्याने महागाईत सुमारे ०.८ टक्क्यांनी वाढ झाली असून त्याचा परिणाम थेट खाणे-पिणे आणि वाहतुकीच्या खर्चावर होतो.
सध्या, देशांतर्गत बाजारात पेट्रोलची किंमत मागील ९ महिन्यात सर्वात खालच्या पातळीवर आली असून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सतत घसरण हे त्याचे सर्वात मोठे कारण आहे.