नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सोमवारी तब्बल ४४,००० कोटी रु.चे नुकसान झाले आहे. कारण त्यांची प्रमुख कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये १३ टक्के घट आली असून ही १२ वर्षातील सर्वात मोठी घट आहे. यासोबतच कंपनीचे शेअर १,१०५ रु. वर आला आहे. फोर्ब्जच्या निव्वळ रिअलटाईम संपत्तीनुसार ४१.८ बिलियन डॉलर होती, जी सोमवारी १२.४० टक्के घट झाली आहे. एकाच दिवसात त्यांची संपत्ती ५.९ बिलियन डॉलर कमी झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतीत ३० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्यावर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सोमवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीतील युद्धामुळे किंमती ३० टक्के जास्त घसरण झाली, जी १९९१ नंतर सर्वात मोठी घट आहे. तेल उत्पादक देशांमध्ये उत्पादनामुळे एकमत न होण्याने प्रमुख तेल निर्यातक सौदी अरेबियाने किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, क्रूडच्या किंमतीतील घट यामुळे RIL नफ्यावर परिणाम होईल.
या तीन वर्षात ३ लाख कोटी रु. घटले, RIL चे बाजार मूल्य
RIL चा बाजार भांडवल आज १ लाख कोटीपेक्षा जास्त आहे. तसेच आरआयएलचे बाजार भांडवल ७ लाख कोटीपेक्षा कमी झाले आहे. मागच्या वर्षात नोव्हेंबरमध्ये आरआयएल १० लाख कोटी रु.च्या मार्केट कॅपसह पहिली भारतीय कंपनी बनली होती. या वर्षात आतापर्यंत आरआयएलचे बाजार भांडवल ३ लाख कोटी रु. खाली आला आहे.
सेन्सेक्समध्ये मोठी घट
जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरस संक्रमणाचा आर्थिक घडामोडींवर परिणाम झाल्याने देश जगाच्या शेअर बाजारात सोमवारी मोठी घट झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १,९४१ अंकांनी घसरला आणि या घसरणीमुळे स्थानिक बाजारामधील गुंतवणूकदारांच्या बाजारपेठेतील स्थितीचे सुमारे ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये ओएनजीसीला सर्वात जास्त १६ टक्क्यांपेक्षा जास्त तोटा झाला आहे.