नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व दिल्लीच्या पॉश भागात वसुंधरामध्ये आई आणि मुलीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वसुंधरा एन्क्लेव्हमध्ये आई आणि मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोघींचाही मृतदेह सोमवारी सकाळी फ्लॅटमधून सापडला असून त्यांची नावे सुमीता (आई) आणि स्मृता (मुलगी) अशी आहेत.
सकाळी झाला डबल मर्डरचा खुलासा –
सांगितले जात आहे की, पतीच्या निधनानंतर सुमिता या मुलगी स्मृतासोबत वसुंधरा एन्क्लेव्हच्या मन्सारा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. सोमवारी सकाळी घरगुती सहाय्यक कामासाठी आले असताना आई-मुलीचा मृतदेह रक्ताने माखलेला पडलेला दिसला. पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. तसेच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
इव्हेंट मॅनेजमेंट करत होती आई –
सुरुवातीला समजले की, जीव गमावणाऱ्या सुमित या इव्हेंट मॅनजमेंट करत होत्या तर त्यांची मुलगी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काम करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघींच्या शरीरावर चाकूच्या गंभीर जखमा आहेत. पहिल्या दृष्टीक्षेपात या हत्येमध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग होता, असे दिसून आले.
ओळखीच्या लोकांवर संशय –
सध्या पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला असून सोसायटीत लावल्या गेलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज तपासली आहे. पोलिसांच्या सूत्रानुसार हत्येत ओळखीच्या लोकांचाही हात असू शकतो.
कॉलची माहिती तपासत आहेत पोलीस –
तपासादरम्यान पोलिसांनी आई आणि मुलीचे फोन ताब्यात घेतले असून कॉल डिटेल्स चेक करत आहेत, जेणेकरुन हत्येपूर्वी या दोघींनी कोणाशी संवाद साधला याची माहिती मिळू शकेल.
पुन्हा उठत आहेत एकट्याने राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न –
होळीच्या एक दिवस अगोदर दिल्लीतील या घटनेमुळे लोक हादरले असून लोकांनी वृद्ध आणि एकटे राहणाऱ्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे.