IND Vs AUS Test Series | भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल; आता ‘या’ ठिकाणी होणार सामना

IND Vs AUS Test Series |ind vs aus 3rd test moved to indore instead of dharmshala as the pitch is not ready for the match bcci tweet

बहुजननामा ऑनलाईन – सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS Test Series) यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु आहे. हे सामने सुरु होण्यापूर्वी सामने कुठे आणि कधी खेळवले जाणार याचे वेळापत्रक बीसीसीआयने निश्चित केले होते. आता या वेळापत्रकात अचानक बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे. (IND Vs AUS Test Series)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

काय करण्यात आला बदल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघातील तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून धर्मशाला या ठिकाणी खेळवण्यात येणार होता. परंतु आता या सामन्याच्या ठिकाणात अचानक बदल करण्यात आला आहे. आता तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीसाठी इंदूर हे ठिकाण निश्चित केले आहे. धर्मशाळेत कडाक्याची हिवाळी परिस्थिती आणि आउटफिल्डमध्ये पुरेसे गवत नसल्यामुळे हे ठिकाण बदलण्यात आले असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

 

 

बीसीसीआयने निवेदनात काय म्हंटले?
बीसीसीआयने निवेदन जाहीर करताना म्हंटले कि, ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी, 1 ते 5 मार्च दरम्यान एचपीसीए स्टेडियम धर्मशाला येथे होणार होती, ती आता होळकर स्टेडियम, इंदूर येथे हलवण्यात आली आहे. आउटफिल्डमध्ये पुरेसे गवत नाही आणि पूर्णपणे ते तयार होण्यासाठी थोडा वेळ लागेल.’ धर्मशाला येथील पिच सामन्यासाठी तयार नसल्याने हा सामना तिथे खेळवला जाणार नाही. असे म्हंटले आहे. (IND Vs AUS Test Series)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या मालिकेतील पहिला कसोटी सामना काही दिवसांपूर्वी पार पडला.
या सामन्यात तीन दिवसांत ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव करून भारत बॉर्डर-गावस्कर
ट्रॉफीमध्ये 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. हा सामना नागपूरमध्ये खेळवण्यात आला होता.
तसेच या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: कसोटी मालिकेचे सुधारित वेळापत्रक
दुसरी कसोटी: 17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी; अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
तिसरी कसोटी: 01 मार्च ते 05 मार्च, होळकर स्टेडियम, इंदूर
चौथी कसोटी: 9 मार्च – 13 मार्च, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

 

Web Title :- IND Vs AUS Test Series |ind vs aus 3rd test moved to indore instead of dharmshala as the pitch is not ready for the match bcci tweet

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | आपल्याला बदला घ्यायचा आहे, पोटनिवडणूकीच्या जाहीर सभेत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

Mrinal Kulkarni | गोव्यातील सांस्कृतिक पुरस्कार सोहळ्यात मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली ‘हि’ खंत; म्हणाल्या….

Maharashtra Weather | 15 फेब्रुवारीनंतर राज्यातील तापमानात होणार वाढ; हवामान खात्याचा अंदाज