Maharashtra Weather | 15 फेब्रुवारीनंतर राज्यातील तापमानात होणार वाढ; हवामान खात्याचा अंदाज
बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Weather | राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. लोकांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत. 15 फेब्रुवारीनंतर महाराष्ट्रातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईमध्ये थंडी बऱ्याच प्रमाणात कमी झाली असून किमान तापमानात (Maharashtra Weather) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 24.2 अंश सेल्सिअसची नोंद तर कुलाब्यात 23.5 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उर्वरित महाराष्ट्रात काय स्थिती?
मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आज आणि उद्या दोन्ही भागातील किमान तापमान कमीच राहणार आहे, मात्र 15 फेब्रुवारीनंतर या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. औरंगाबादमध्ये 10.2 अंश सेल्सिअस, नाशिक 10.9, पुणे 10.6, महाबळेश्वर 13.4, बारामती 12.8 आणि जळगावात 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (Maharashtra Weather)
उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन
उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे त्यांचं शरीर आतून हायड्रेट राहतं. उन्हाळ्यात लिंबू पाणी, ज्यूस, सरबत प्या. मुलांना उन्हाळ्यात कॉटनचे कपडे घालायला लावा. कॉटनचे कपडे लगेच घाम शोषून घेतात.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर परिणाम
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढ- उतार पाहायला मिळत आहेत.
बहुतांश भागात कांदा पिकावर करपा रोग पसरल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
तसेच गहू, हरभरा, मका या पिकांना देखील या वातावरणामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.
यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत सापडला आहे.
Web Title :- Maharashtra Weather | temperature in the state will rise after february 15
हे देखील वाचा :
Comments are closed.