Mrinal Kulkarni | गोव्यातील सांस्कृतिक पुरस्कार सोहळ्यात मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केली ‘हि’ खंत; म्हणाल्या….

Mrinal Kulkarni | mrunal kulkarni dig on marathi artist she said they dont have respect towards art

बहुजननामा ऑनलाईन – Mrinal Kulkarni | गोवा राज्यातील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या वतीने देण्यात येणारे राज्य सांस्कृतिक पुरस्कार, युवा सृजन पुरस्कार, उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, 8 रोजी सायंकाळी 4.30 वाजता दर्या संगम, कला अकादमी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून प्रख्यात चित्रपट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंतदेखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यासोबतच कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सचिव मिनिनो डिसोझा आणि कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप उपस्थित होते.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

यावेळी मृणाल कुलकर्णी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की , “गोव्यासाठी आम्ही मराठी कलाकार काहीही करू शकतो. गोव्यात येण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. गोव्यात येण्यासाठी आमची दोन कारणे असतात. त्यातलं पाहिलं कारण म्हणजे या भूमीवर यायला गोवेकरांना भेटायला आम्हाला खूप आवडतं. आणि दुसरं म्हणजे या गोव्याच्या भूमीतून भरपूर काही शिकण्यासारखं असतं.

 

इथे आल्यावर कळत जिव्हाळा म्हणजे काय ओलावा म्हणजे काय, कला म्हणजे काय आणि ती कला रसिक प्रेक्षकांनी अनुभवणं म्हणजे काय, म्हणूनच मी एक माणूस म्हणून कलाकार म्हणून मला गोव्याला यायला खूप आवडतं.”त्या पुढे म्हणाल्या, “गोवा आम्हाला आणखीन एक गोष्ट शिकवतं ते म्हणजे नम्रपणा, आम्ही जेव्हा इथे येतो आणि इथल्या कलाकरांना बघतो, त्यांची कला अनुभवतो त्याचा आस्वाद घेतो तेव्हा असं वाटतं अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या पुणे मुंबईकडच्या आम्हा कलावंतांना नम्रता म्हणजे काय हे गोव्यात येऊन कळतं. कित्येक नाट्यसंस्था इथे काम करत आहेत. त्यांना आजवर ओळख मिळालेली नाही किंवा ते टीव्हीवर आलेले नाहीत मात्र त्यांची निष्ठा इतकी मोठी आहे की ती भल्याभल्याना जमणार नाही.”

 

 

मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांनी मराठी चित्रपट आणि मालिकाच नव्हे तर,
हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे .
‘सोनपरी’ बनून अवघ्या चिमुकल्यांचं विश्व व्यापून टाकलेल्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या त्यांच्या
अनेक भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या. मृणाल यांनी रुचिर कुलकर्णी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.
या जोडीला एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा देखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
मृणाल कुलकर्णी या सध्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘शिवराज अष्टक’ चित्रपट सीरीजमध्ये ‘जिजाऊं’ची
भूमिका साकारत आहेत.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Mrinal Kulkarni | mrunal kulkarni dig on marathi artist she said they dont have respect towards art

 

हे देखील वाचा :

Maharashtra Weather | 15 फेब्रुवारीनंतर राज्यातील तापमानात होणार वाढ; हवामान खात्याचा अंदाज

Pune Double Murder Case | पुण्यातील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं, आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी UPSC करणाऱ्याने दाम्पत्याला संपवलं

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची गर्दी’, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल