Pune Double Murder Case | पुण्यातील दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकललं, आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी UPSC करणाऱ्याने दाम्पत्याला संपवलं

 Pune Double Murder Case | pune dapodi couple life taken by upsc aspirant to take revenge of sexual assault on mother

पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन  Pune Double Murder Case | दापोडीत बेसावध असलेल्या दाम्पत्यावर जमीन खोदण्याच्या टीकावाने घाव घालून हत्या करण्यात आली होती. दुहेरी हत्याकांडामुळे (Pune Double Murder Case) पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली (Pune Pimpri Chinchwad Crime) होती. या दुहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले आहे. सहा वर्षापूर्वी आईवर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेचा बदला घेण्यासाठी 32 वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल टाकले. युपीएससी परीक्षेची (UPSC Exam) तयारी करणाऱ्या युवकाने सुडाच्या भावनेतून हे हत्याकांड केल्याचे तपासात समोर आले आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

मारुती उर्फ शंकर नारायण काटे Maruti alias Shankar Narayan Kate (वय 60), संगीता मारुती काटे Sangeeta Maruti Kate (वय 56, दोघे रा. दापोडी) अशी खून झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. प्रसन्ना प्रमोदराव मंगरूळकर Prasanna Pramodarao Mangrulkar (वय 32, रा. खेड मक्ता, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणी शगुन रघुनाथ काटे Shagun Raghunath Kate(वय 26 वर्ष, रा. दापोडी गावठाण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे.

 

आरोपीने डोक्यात फावडे घालून खून केला. आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी आरोपी दिल्लीवरुन (Delhi) थेट पुण्यात आला होता. खून केल्यानंतर आरोपी रक्ताने माखलेल्या अवस्थेतील फावडा घेऊन पोलीस ठाण्यात जात असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सर्व हकिकत सांगितली. (Pune Double Murder Case)

 

आरोपी प्रसन्ना मंगरुळकर हा उच्चशिक्षित असून त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तसेच त्याची आई ही चंद्रपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका (Zilla Parishad School Teacher) होती. प्रसन्नला पिंपरी चिंचवड शहरात एका बँकेत नोकरी लागल्यानंतर 2015 मध्ये तो आणि त्याची आई दापोडी गावठाण येथे राहायला आले. त्यावेळी ते दोघे मयत काटे यांच्याकडे भाडेकरु म्हणून राहत होते.

 

दोन वर्षे काटे यांच्या खोलीत भाड्याने राहत असताना काटे याने आईवर अत्याचार केल्याचे प्रसन्ना याने पोलिसांना सांगितले. यानंतर ते दोघे तळेगाव दाभाडे येथे राहण्यास गेले.
काही दिवसांतच त्याच्या आईचे देखील निधन झाले. त्यामुळे तो एकटा पडला.
यानंतर त्याने युपीएससी करण्यासाठी थेट दिल्ली गाठली.
परंतु काटे हे सतत त्रास आणि धमकी देत असल्याचा दावा त्याने केला.
त्यातच आईवर झालेल्या अत्याचाराचा राग त्याच्या डोक्यात होता.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

या घटनेचा बदला घेण्यासाठी प्रसन्ना याने थेट दिल्ली वरुन पुणे गाठले.
बॅगेत एक ब्लँकेट, टॉवेल, आणि दीड हजार रुपये घेऊन तो शनिवारी विमानाने पुणे विमानतळावर
(Pune Airport) आला. तेथून तो पायी चालत दापोडी येथे आला. त्याने एका दुकानातून जमीन खोदण्याचा टीकाव
खरेदी केला आणि काटे यांच्या घरी गेला.

 

त्याने शंकर काटे यांचा टीकावाने मारुन खून केला. त्याला प्रतिकार करणाऱ्या काटे यांच्या पत्नीला देखील
त्याने मारुन टाकले. त्यानंतर तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत हातात टिकाव घेऊन पोलीस ठाण्यात हजर
होण्यासाठी जात होता. त्यावेळी नागरिकांनी त्याला अडवले आणि पोलिसांना बोलावून घेतले.
रस्त्याने जाताना तो ‘जगदंब जगदंब’ असा जयघोष करत होता.
प्रसन्न याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Double Murder Case | pune dapodi couple life taken by upsc aspirant to take revenge of sexual assault on mother

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll Election | ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेला केवळ खुर्च्यांची गर्दी’, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Pune Crime News | हडपसरमध्ये दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील दोघांना अटक, पाबळमधील उसाच्या रानात पाठलाग करुन ठोकल्या बेड्या