Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुना क्लब, एसके डॉमिनेटर्स संघांची विजयी कामगिरी

Indrani Balan Winter T-20 League | 2nd 'Indrani Balan Winter T20 League' Championship Cricket Tournament; Winning performance of Puna Club, SK Dominators teams

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Indrani Balan Winter T-20 League | पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुना क्लब आणि एसके डॉमिनेटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली. (Indrani Balan Winter T-20 League)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत यश नहार याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पुना क्लब संघाने पुणे पोलिस संघाचा ८ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे पोलिस संघाने १२२ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये महेश राठोड याने नाबाद ६० धावांचे योगदान दिले. हे आव्हान पुना क्लब संघाने १०.४ षटकात आणि २ गडी गमावून पूर्ण केले. यश नहार याने ५३ धावांची खेळी केली. अकिब शेख याने ४१ धावांची खेळी करून दुसर्‍या बाजूने उत्तम साथ दिली आणि संघाने सहज विजय मिळवला. (Indrani Balan Winter T-20 League)

 

साहील औताडे याच्या कामगिरीच्या जोरावर एसके डॉमिनेटर्स संघाने औरंगाबादच्या व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ५६ धावांनी पराभव केला. एसके डॉमिनेटर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २०७ धावांचा डोंगर उभा केला. साहील औताडे (६८ धावा), यतिंद्र कार्लेकर (नाबाद ४६ धावा) आणि सुहेल श्रीखंडे (४३ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर एसके संघाने विशाल धावसंख्या उभी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा डाव १५१ धावांवर मर्यादित राहीला. अश्कन काझी याने नाबाद ८४ धावांची एकहाती खेळी केली.

 

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
पुणे पोलिसः २० षटकात ७ गडी १२२ धावा (महेश राठोड नाबाद ६० (५७, ६ चौकार, ३ षटकार), एस. कदम १५),
सागर मल्लेपट्टी २-२२, यश नहार १-१०) वि.वि. पुना क्लबः १०.४ षटकात २ गडी बाद १२५ धावा
(यश नहार ५३ (२३, ४ चौकार, ५ षटकार), अकिब शेख ४१, अमोल पायगुडे १-२३); सामनावीरः यश नहार;

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

एसके डॉमिनेटर्सः २० षटकात ७ गडी बाद २०७ धावा (साहील औताडे ६८ (३३, ३ चौकार, ७ षटकार),
यतिंद्र कार्लेकर नाबाद ४६ (३१, ५ चौकार, १ षटकार), सुहेल श्रीखंडे ४३ (२३, १ चौकार, ५ षटकार),
आकाश लोखंडे २-२८) वि.वि. व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ८ गडी बाद १५१ धावा
(अश्कन काझी नाबाद ८४ (४४, १० चौकार, ४ षटकार), अझीम काझी १७, अजय बोरूडे ३-२१);
सामनावीरः साहील औताडे;

 

 

Web Title :- Indrani Balan Winter T-20 League | 2nd ‘Indrani Balan Winter T20 League’ Championship Cricket Tournament; Winning performance of Puna Club, SK Dominators teams

 

हे देखील वाचा :

IND Vs AUS Test Series | भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल; आता ‘या’ ठिकाणी होणार सामना

Ajit Pawar | आपल्याला बदला घ्यायचा आहे, पोटनिवडणूकीच्या जाहीर सभेत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

Maharashtra Weather | 15 फेब्रुवारीनंतर राज्यातील तापमानात होणार वाढ; हवामान खात्याचा अंदाज