मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. त्यानंतर विविध स्तरावरुन या घटनेवर प्रतिक्रिया उमटल्या. डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानं देशभरात खळबळ उडाली होती. या ‘सिंघम स्टाईल’ कारवाईचं सोशल मीडियावरून भरभरून कौतुक होतंय. पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर, आपली मुलगी अशाच भीषण घटनेत गमावलेल्या, दिल्लीतील ‘निर्भया’च्या आईनंही पोलिसांना सलाम केला आहे आणि आपल्या मुलीच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशी देण्याची विनंती त्यांनी केली आहे.
Asha Devi, Nirbhaya's mother: I have been running from pillar to post for the last 7 years. I appeal to the justice system of this country and the government, that Nirbhaya's culprits must be hanged to death, at the earliest. https://t.co/VoT5iv2caf pic.twitter.com/5ICgJUYaNz
— ANI (@ANI) December 6, 2019
निर्भया’ची आई आशा देवी यांनी एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांची पाठराखण करत आपल्या मनातील वेदनांनाही वाट मोकळी करत म्हणाली की, गेली सात वर्षं माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून मी संघर्ष करतेय. न्यायालयात खेटे मारतेय. कोर्ट आरोपींच्या मानवाधिकाराचा मुद्दा पुढे करतंय. त्यामुळेच हैदराबादमध्ये जे झालं त्याने मी खूप खूश आहे. पोलिसांनी खूप चांगलं काम केलंय, त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होता कामा नये. उलट त्यांनी एक उदाहरण घालून दिलं आहे. अशा कारवायांची आज गरज आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी आपले मत मांडले.
Visit : bahujannama.com