बहुजननामा ऑनलाईन टीम : सध्या वॉट्सअॅपचा वापर सर्वाधिक केला जातो. जास्तीत जास्त लोक यावर अपडेट असतात. वॉट्सअॅपमध्ये अनेक फिचर्स आहेत. त्याप्रमाणे तुमची प्रायव्हसी ठेवण्यासाठी तुम्ही काही नंबर ब्लॉक देखील करु शकता. पण जर कोणी तुम्हाला ब्लॉक केले असेल आणि ते तुम्हाला पहायचे असेल तर काही महत्वाच्या टिप्स आहेत ज्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आपल्याला कोणी ब्लॉक केले आहे हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. परंतू ते कसे कळले हे जाणून घेऊया.
तुम्हाला ज्याने ब्लॉक केले आहे त्याचा प्रोफाईल फोटो दिसत नाही
वॉट्सअॅप वर जर एखाद्याचा प्रोफाईल फोटो तुम्हाला नेहमी दिसतो आणि अचानक तो गायब झाला जर समजावे की त्या युजरने तुम्हाला ब्लॉक केले आहे. अनेकदा काही जणांना आपले प्रोफाईल फोटो लावायला आवडत नाही अशा वेळी तुम्ही दुसऱ्या नंबर वरुन पाहू शकता की त्या व्यक्तीचा फोटो दिसतो का ? जर दिसत नसेल तर समजून जा.
मेसेज पाठविव्यानंतर सिंगल चेक मार्क
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मेसेज केला आहे परंतू तो त्याला डिलिव्हरच होत नाही अशा वेळेस स्क्रिनवर फक्त सिंगल टिक दिसते. असे जर वारंवार होत असेल तर तुमचा मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहचत नाही. त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले असते.
युजरचे ऑनलाइन न दिसणे
एखादा युजर जर ऑनलाइन असून तुम्हाला दिसत नसेल तर समजून घ्या त्या युजरने तुम्हाला ब्लॉक केलं आहे. अशा व्यक्तीचा केवळ लास्ट सिन तुम्हाला दिसेल. जर त्या व्यक्तीने लास्ट सिन हाईड केला असेल तर तुम्ही त्याच्या नावाखाली पाहू शकता तो जर ऑनलाइन असून तुम्हाला दिसत नसेल तर समजून जा की त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलेले आहे.
कॉल लावून तपासून पहा
जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला वॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करु शकता. तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला रिंग वाजताना एकू येत असेल परंतू त्या व्यक्तीला कॉल पोहचत नाही अशावेळी समजून जा की तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केले आहे.
Visit : bahujannama.com