बहुजननामा ऑनलाईन टीम : आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी कॉंग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अंमलबजावणी संचानालयाने (ईडी) अटक केली होती. ते तब्बल १०६ दिवस तिहार तुरुंगात होते. २ लाख रुपयांच्या जातमुलक्यावर आणि देश सोडून न जाण्याच्या अटींवर सुप्रीम कोर्टाने चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे.
जामीन मंजूर झाल्यानंतर चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केले आहे. याआधी चिदंबरम यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यावेळी मी काय रंगा-बिल्ला आहे काय, अशी विचारणा चिदंबरम यांनी न्यायालयात केली होती.
Supreme Court grants bail to former Finance Minister & Congress leader P Chidambaram in INX Media money laundering case, registered by the Enforcement Directorate (ED). pic.twitter.com/m2yWKFNOlT
— ANI (@ANI) December 4, 2019
चिदंबरम यांच्या अटकेवरुन दिल्लीतील राजकारण भयंकर तापलं होतं. तब्बल १०६ दिवसानंतर म्हणजेच साडेतीन महिने तुरुंगात राहिल्यानंतर चिदंबरम यांचा जामीन झाला आहे. आगामी काळात आयएनएक्स मीडिया प्रकरणाचं नेमकं काय होत. हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता सर्वोच्च न्यायालयानं चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला. दोन हमीदारांसह २ लाख रुपयांच्या बॉण्डवर न्यायालयानं त्यांचा जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती आर. बानुमती यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं हा निकाल दिला आहे.
Visit : bahujannama.com