मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आपल्या दैनंदिन व्यवहारात आधार कार्ड हे महत्वाचे दस्तऐवज आहे. पॅन कार्डासाठी अर्ज करायचा असो की आयकर परतावा भरायचा असो किंवा कुठलंही सरकारी अनुदान घ्यायचं असो, त्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. मात्र आधार कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र आदि अधिकृत ओळखपत्राचा पुरावा देणे गरजेचे असते. परंतु आपल्याकडे अशी कोणतीही कागदपत्र नसल्यास तर आधारकार्ड कसा काढायचं? हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र त्यासाठी UIDAI च्या आधार एनरोलमेंट फॉर्मनुसार, जर कोणाकडे प्रूफ ऑफ आयडेंटिफिकेशनसाठी कागदपत्र नसेल तर त्यासाठी कोणतीही परिचित व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्याची आवश्यकता असते.
कुटुंबातील सदस्यांद्वारे आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी:
आपल्याकडे अधिकृत ओळखपत्राचा पुरावा नसेल तरी तो आधार कार्डासाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी त्याचं नाव त्याच्या कुटुंबातील कोणत्याही एका कागदपत्रावर असणे गरजेचे असते. म्हणजेच, रेशन कार्ड. परंतु यासाठी आधी कुटुंबप्रमुखाने आधार कार्ड बनवावं अनिवार्य आहे. त्यानंतर तो प्रमुख कुटुंबातील इतर सदस्यांचा परिचयदाता होऊ शकतो.
तसेच, परिचयदात्याने आपलं ओळखपत्र सोबत घेऊन जावं. केंद्रावर तो सदस्यही स्वत: उपस्थित हवा. दोघांमधील नातं दाखवणारं कोणतंही कागदपत्र हवं. या नात्याच्या पुराव्यासाठी पुढील विविध प्रकारच्या कागदपत्रांची यादी सरकारने दिलेली आहे.
१) पेंशन कार्ड
२) पासपोर्ट
३) जन्मदाखला
४) पीडीएस कार्ड
५) आर्मी कँटीन कार्ड
६) मनरेगा जॉब कार्ड
७) ईएसआयसी मेडिकल कार्ड
८) केंद्र किंवा राज्य सरकारचं फॅमिली एन्टायटलमेंट कागदपत्र
९) फॅमिली एन्टायटलमेंट डॉक्युमेंट
१०) सरपंचाने दिलेलं फोटो प्रमाणपत्र
११) रुग्णालयाचं डिस्चार्ज कार्ड
१२) खासदार,आमदार, नगरसेवक किंवा गॅजेटेड अधिकाऱ्यांद्वारे दिलेलं फोटो प्रमाणपत्र
१३) पोस्टाचं अॅड्रेस कार्ड
दरम्यान, परिचयदाता म्हणजे अशी व्यक्ती जिला रजिस्ट्रारद्वारे अशा निवासींसाठी सत्याधारित प्रत देण्यास नियुक्त केले जाते ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही. परिचयदात्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे, शिवाय अशा व्यक्तीला आधार नोंदणी केंद्रात उपस्थित राहणेदेखील अनिवार्य आहे.