बहुजननामा ऑनलाईन टीम – अनेक राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे एक वेगळेच नाते असते. नेत्यांच्या एका इशाऱ्यावर काम करणारे कार्यकर्ते देशाने पाहिले आहेत. अश्याच एका कार्यकर्त्याने आपल्या लाडक्या नेत्याला ताजा भाजीपाला मिळावा म्हणून २०० किलोमीटर अंतर दुचाकीवर पार केले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना ताजा भाजीपाला घेऊन शिरूर ते थेट मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर हा कार्यकर्ता पोहचला. शरद पवारांनी त्यांचं ट्विटरच्या माध्यमातून त्याच कौतुक केले आहे.
सुनील सुक्रे असे या शरद पवारांच्या सच्च्या कार्यकर्त्याचे नाव आहे. सुनील हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील केंदुर गावचा रहिवाशी आहे. त्याने दुचाकीवरून दोनशे किलोमीटरचा प्रवास करत आपल्या शेतातील ताजा भाजीपाला पवारांच्या सिल्वर ओक निवास्थानी घेऊन पोहोचला. महत्वाचे म्हणजे, सिल्वर ओक येथे राजकीय घडामोडींच्या गोंधळातही या शेतकऱ्याच्या पुत्राला शरद पवार आवर्जून भेटले. या तरुणाने आणलेला ताजा भाजीपाला घेतला आणि या तरुण शेतकऱ्याचे प्रेम पाहून भावुक शरद पवारांनी ट्विटरवर फोटो टाकून या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
सुनील सुक्रे ह्या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या शेतकऱ्याने २०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करून मला मुंबईत भाजीपाला आणून दिला. अशा काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेम हीच माझी शक्ती आहे. pic.twitter.com/9T7o3BuzSu
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 22, 2019
विधानसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार दिवस-रात्र विरोधकांचा संघर्ष करताना प्रत्येक नागरिक पाहत आहे. वयाच्या ८० व्या वर्षी हा नेता शेतकऱ्यांसाठी लढत आहे, ही गोष्ट लक्षात घेता आपल्या नेत्याला शेतात पिकवलेला ताजा भाजीपाला घेऊन सुनील शुक्रे या तरुणाने पहाटे भाजीपाला, तरकारी माल अशा विविध भाज्या काढून दुचाकीवरून निघुन थेट सिल्वर ओक बांगला गाठला.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाडदेखील या शेतकरी तरुणाला भेटले. शदर पवारांनीही त्याचे आभार मानत, शेतकऱ्यांना पुढील काळात योग्य न्याय देण्याचे आश्वासन यावेळी दिल्याचं सुनील सुक्रे या तरुणाने सांगितलं.