लखनौ : वृत्तसंस्था – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची शुक्रवारी भरदुपारी गोळया झाडून आणि गळा दाबून हत्या झाली आहे. तिवारींच्या हत्येमुळं संपुर्ण उत्तरप्रदेशात खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या 3 हल्लेखोरांनी खुर्शीद बाग येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात आल्यावर त्यांची हत्या केली. हल्लेखोरांनी मिठाईच्या डब्यात चाकू आणि पिस्तूल आणले होते. गोळया झाडल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांचा गळा दाबला. जखमी झालेल्या तिवारींचा ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
Lucknow: Hindu Mahasabha leader Kamlesh Tiwari critically injured after being shot at in his office. More details awaited. pic.twitter.com/KoQifAZW8X
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 18, 2019
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. डिसेंबर 2015 मध्ये तिवारींनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्याविरूध्द त्यावेळी गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक झाली होती. सध्या तिवारी हे जामीनावर बाहेर होते. तिवारींची भरदिवसा गोळया झाडून हत्या झाल्याने संपुर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि हिंदू महासभेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद केली आहे.
Visit : bahujannama.com