मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असून, पक्षनेत्यांची एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची फेरी सुरुच आहे. अश्यातच पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. त्यांच्याविरोधात मनसेने किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली असून शिंदे यांना विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे असल्याने स्थनिक विरुद्ध बाहेरचा अशी लढाई कोथरूडमध्ये दिसून येत आहे.
काही मराठी म्हणींचे नवे अर्थ…#NCP2019 #राष्ट्रवादीपुन्हा #MaharashtraAssemblyPolls #AssemblyElections #MaharashtraElections2019 pic.twitter.com/364mN4q9Fe
— NCP (@NCPspeaks) October 18, 2019
दरम्यान कोथरूड मतदार संघात आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मेधा यांना २०१४ च्या निवडणुकीत १ लाखांहून जास्त मते मिळाली होती, त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी सुरक्षित मानला जातो. परंतु मेधा यांना संधी न दिल्याने ब्राम्हण संघटनांनी चंद्रकांत पाटील यांना विरोध केला होता.
चंद्रकांत पाटील हे बाहेरचे असल्याने विरोधकांनी त्यांना टार्गेट केले आहे. ‘चंपा ‘ या नावाने त्यांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीने मराठी म्हणींचे अर्थ काढत चंद्रकांत पाटील यांना धारेवर धरले आहे. बाहेरन आलेले चंद्रकांत पाटील म्हणजे ‘आयता बिळात चंदूबा’ असा टोला लगावला आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी मला माझी आई लाडाने चंदा म्हणते, असे प्रतिउत्तर चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना लगावले आहे. कोथरूड मतदार संघात राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा न करता मनसेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध मनसे हि लढत चांगली रंगणार आहे.
Visit : bahujannama.com