मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – गनिमी कावा करुन छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्या शत्रूंच्या बालेकिल्ल्यात घुसत असत. हीच पद्धत वापरत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-येड्रावकर यांनी शुक्रवारी कर्नाटक पोलिसांना चकवा देत बेळगाव गाठले आणि तेथे जाऊन सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केले. नंतर त्यांना बेळगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन कर्नाटक सीमेवर सोडले. बेळगावात जाण्यासाठी राज्यमंत्री येड्रावकर यांनी चक्क एसटी बस, ऑटो रिक्षातून प्रवास केला.
पोलिसांचे जाळे भेदून, असे पोहचले बेळगावात
सर्व टोलनाक्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने राज्यमंत्री येड्रावकर यांना छत्रपती शिवाजी महारांचा गनिमी कावा वापरावा लागला. बेळगावला जाण्यासाठी येड्रावकर कोल्हापूर ते कागल टोलनाका असा खाजगी वाहनाने प्रवास केला. कागल टोलनाक्यावरील पोलीस तपासणी आणि मोठा पोलीस बंदोबस्त पाहून येड्रावकर यांनी खासगी वाहन सोडून दिले. त्यानंतर ते महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसने संकेश्वरपर्यंत गेले.
कर्नाटकच्या बसने प्रवास
महाराष्ट्राच्या एसटी बसेसचीही तपासणी पोलीस करत असल्याचे समजताच राज्यमंत्र्यांनी संकेश्वर येथून कर्नाटक एसटी महामंडळाच्या बसने बेळगावमधील पुढील प्रवास केला. बेळगावात गेल्यानंतर आदरांजली स्थळ, हुतात्मा चौकापर्यंत जाण्यासाठी ते चक्क 6 आसनी टमटम रिक्षात बसले. येथे पोहचल्यावर त्यांनी हुतात्म्यांना श्रंद्दाजली अर्पण केली. यानंतर शिवसेना वैद्यकीय पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी महाराष्ट्र सरकारने नेमलेले समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश वाचून दाखवला.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा