अहमदाबाद : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांना गुजरात पोलिसांनी विरमगावजवळील हांसलपुरमधून अटक केली आहे. पाटीदार अनामत आंदोलनाच्या वेळी दाखल झालेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यात हार्दिक पटेल यांच्याविरोधात न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते, त्यानंतर काही तासांच्या आतच त्यांना अटक करण्यात आले. राजद्रोहाच्या गुन्ह्यात हार्दिक पटेल हे न्यायालयातील सुनावणीसाठी अनेकवेळा अनुपस्थित राहिले, ज्यामुळे हे अजा मिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
पोलीस उपायुक्त (डीसीपी) राजदीपसिंह जाला (गुन्हे शाखा) यांनी पटेल यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. जाला यांनी म्हटले की, आम्ही हार्दिक पटेल यांच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर त्यांना वीरमगावजवळून अटक केली आहे. आम्ही त्यांना न्यायालयासमोर हजर करणार आहोत.
अहमदाबादमध्ये 25 ऑगस्ट 2015 ला पटेल समाजाच्या रॅलीमध्ये हिंसा घडली होती. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून पटेल यांना अटक केली होती.
दरम्यान, हार्दिक पटेल यांच्या अटकेनंतर गुजरात हार्दिक पटेलसोबत या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले की, मोठ्या कालावधीनंतर गुजरातमध्ये काँग्रेस मजबूत करण्यासाठी काम करणार्या हार्दिक पटेल यांना रोखण्यासाठी भाजपा सरकारने कायद्याच्या माध्यमातून त्रास देण्याची योजना आखली आहे. या ट्विटला हार्दिक पटेल यांच्य अधिकृत हँडलवरून रिट्विट केले आहे.
एका अन्य ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुजरातचे युवा नेता हार्दिक पटेल यांना अहमदाबाद क्राइम ब्रांचने अटक केली आहे. सरकारला जेव्हा भिती वाटते तेव्हा पोलिसांना पुढे करण्यात येते. असेही हार्दिकला सरकार घाबरत आहे आणि अटक करण्यात आली. परंतु, आता जनता जागृत झाली आहे. पुढील निवडणुकीत भाजपाला जशास तसे उत्तर मिळेल.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा