मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आकुर्डी येथे पक्षाच्या कार्यक्रमातच भाजपामधील मेगा भरतीवर भाष्य केले होते. यामुळे राजकीय विरोधकांना आयतेच कोलीत सापडले असून ते भाजपावर तोंडसुख घेत आहेत. या वक्तव्याने अडचणीत आलेल्या पाटील यांनी आता यू-टर्न घेतला आहे. शिवाय, पत्रकारांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. मेगा भरतीमुळे भाजपाची संस्कृती बिघडली. मेगा भरती ही मेगा चूक होती, असे त्यांनी काल म्हटले होते. आता सारवासारव करत पाटील यांनी, भाजपामध्ये आलेल्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांचा आम्हाला फायदाच झाल्याचे म्हटले आहे.
आकुर्डीतील कालच्या वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, भाजपामध्ये आलेल्या लोकांचा आम्हाला फायदाच झाला आहे. भाजपा कार्यकर्त्यांची पार्टी आहे. आमची पार्टी कोणाचीही मालकी होऊ शकत नाही. ती कार्यकर्त्यांच्या मालकीची आहे. कालच्या आकुर्डीतील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. माध्यमांनी बातमी दाखविण्याअगोदर पडताळणी केली पाहिजे. जुन्यांना डावलले असे नाही, 27 तिकीटे नव्या लोकांना दिली. भाजपामध्ये मेगा भरतीचा निर्णय कोअर कमिटीचा होता. तो माझ्या एकट्याचा नव्हता, असे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजपात मेगा भरती ही मेगा चूक होती. हा माझा, हा तुझा यामुळे भाजपाचे नुकसान झाले आहे. दिल के नजदीक है याला महत्त्व नसून पार्टी के नजदिक है याला महत्त्व द्यायला हवे. मेगा भरतीमुळे भाजपाची संस्कृती बिघडली आहे. मेगा भरती ही मेगा चूक होती, असे काल आकुर्डीत कबुल करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून आज घुमजाव करून आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हणत पत्रकारांवर ठपका ठेवला आहे. दरम्यान, त्यांच्या कालच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपाने आता तरी सुधारावे, असे सावंत यांनी म्हटले आहे.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या
- झोपल्यावर घाम येत असल्यास ‘या’ 9 कारणांचा विचार करा