बहुजननामा ऑनलाइन टीम – प्रोत्साहन पॅकेजमध्ये रोजगारासाठी पीएफ सबसिडीची(PF subsidy) घोषणा केंद्र सरकार लवकरच करण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि कंपनी दोघांसाठी 10 टक्के पीएफ स्वरूपात हे अनुदान असू शकते. 31 मार्चला पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजना केंद्र सरकारने बंद केली होती. परंतु ही योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे.
मासिक वेतन 15,000 रुपयांपर्यंत असावे
मनी कंट्रोलच्या वृतानुसार, पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेच्या नवीन आवृत्तीअंतर्गत पुढील दोन वर्षांसाठी नव्या रोजगारासाठी अनुदानाची घोषणा होऊ शकते. पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेअंतर्गत सरकार नवीन कर्मचार्यांना 3 वर्षांपर्यंत ईपीएफ आणि ईपीएसमध्ये 12 टक्क्यांचे योगदान देत होते. योजनेचा लाभ 1 एप्रिल, 2016 पर्यंत ईपीएफओ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या, तसेच आणि मासिक वेतन 15,000 रुपयांपर्यंत आहे अशा कर्मचार्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल.
दोन वर्षांसाठी अनुदान
कामगार मंत्रालयाने हा प्रस्ताव अंतिम केला आहे. सरकार पुढील आर्थिक पॅकेजमध्ये याची योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. आगामी दोन वर्षांसाठी अनुदान देण्याची सरकारची योजना आहे. मात्र ही योजना सुरू होण्यास 6-7 महिने लागू शकतात, असे मनी कंट्रोलच्या वृत्तात म्हटले आहे.
या आहेत अटी
प्रस्तावानुसार सबसिडी योजनेचा लाभ 15000 रुपये प्रतिमहिन्यापेक्षा जास्त पगार असेल तर मिळणार नाही. कंपनीत 50 किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी असल्यास त्या कंपनीला किमान दोन नवीन कर्मचारी भरण्यास सांगितले जाऊ शकते. जर त्यात 50 हून अधिक कर्मचारी असतील तर या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कमीतकमी पाच नवीन नोकरभरती कराव्या लागतील.
एक नवीन कर्मचारी तोच आहे जो 1 एप्रिल 2016 आधी ईपीएफओमध्ये नोंदणीकृत कंपनीत काम करत नाही. जर या नव्या कर्मचार्याकडे नवे यूएएन (युएएन) नसेल तर ते कंपनीकडून ईपीएफओ पोर्टलद्वारे प्रदान केले जाते, पंतप्रधान रोजगार प्रोत्साहन योजनेच्या वेबसाइटनुसार म्हटले आहे.