बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशभरात दुकाने, मॉल्स बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यापार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला होता. केंद्रीय गृहमंत्रालयानं शनिवारपासून देशभरातील दुकाने उघडण्याची सशर्त परवानगी दिली होती. परंतु कॅन्टोनमेंट झोन किंवा करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी नसणार आहे. मद्य विक्री करणार्या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचेही स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.
शहरांमध्येही महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील सर्व स्टँडअलोन शॉप्स, रहिवासी परिसरातील दुकाने आणि रेसिंडेन्सिअल कॉप्लेक्समधील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. बाजारपेठांमधील दुकाने मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. शॉपिंग मार्केट, मार्केट कॉम्पलेक्स आणि शॉपिंग मॉल्स सुरू ठेवण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकांनांनाच सुट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ई-कॉमर्स कंपन्यांनाही पूर्वीप्रमाणेच केवळ जीवनावश्यक वस्तूं पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त मद्य विक्री करणार्या दुकांनाना सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचेही स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. राज्यांनी किंवा केंद्रशासित प्रदेशांनी जाहीर केलेल्या कॅन्टोनमेंट झोन किंवा करोना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणी मात्र कोणतीही दुकाने सुरू ठेवण्याला परवानगी नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.