भोपाळ – मध्यप्रदेशातील भोपाळ मध्ये सात वर्षीय बालिकेवर बलात्कार करून आरोपींनी तिचे डोळे फोडण्याचे क्रूर कृत्य केले तसेच आरोपींनी तिचा मृत्यू व्हावा या उद्देशाने तिच्या डोळ्यांना दुखापत करून तिचे हात पाय बांधून तिला जंगलात फेकले. या घटनेचा सर्वच स्तरातून जोरदार निषेध नोंदवण्यात येत आहे.
मध्यप्रदेश मधील लॉकडाऊन सुरु असल्यापासूनची बलात्काराची तिसरी घटना आहे.
पीडित बालिकेला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात त्यांनतर पीडितेला जबलपूरच्या रुग्णालय दाखल करण्यात आले, तिथे तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले, पीडित बालिका ज्यावेळी जखमी अवस्थेत सापडली तेव्हा तिच्या डोळ्यातून रक्त येत होते तसेच तिचे डोळे सुजले होते, पीडित बालिकेवर डोळ्यांची शाश्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे पीडितेला आता दिसू शकते. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे