बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : गुगल पे(Google Pay) चा लोगो म्हणजे अॅप आयकॉनमध्ये बदल केला जात आहे. नवा आयकॉन जुन्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे आणि हा कंपनीच्या थीम कलर बेस्ड आहे.
गुगल पे(Google Pay) ला भारता अगोदर तेज च्या नावाने लाँच करण्यात आले होते. यानंतर याचे नाव बदलले. आता भारतात हे पेमेंट अॅप खुप लोकप्रिय झाले आहे.
गुगल पे सध्याच्या अॅप आयकॉनबाबत बोलायचे तर यामध्ये गुगल पे च्या लोगोवर जी आहे आणि यानंतर पे लिहिले आहे. परंतु, नव्या लोगोमध्ये जी आणि पे दोन्हीही नाही.
गुगल पे च्या नव्या अॅप आयकॉनबाबत बोलायचे तर हा मल्टी कलर आहे. यामध्ये ब्ल्यू, ग्रीन, यलो आणि रेड कलर वापराला आहे, गुगलच्या ब्रँडिंगमध्ये सुद्धा हे कलर्स वापरले जातात.
गुगल पे चा सध्याचा लोगो
नव्या लागोमध्ये स्मॉल यू आणि एन चा शेप दिला आहे आणि दोन्ही एकमेकांना ओव्हरलॅप करत आहेत. हा लोगो दिसायला थ्रीडी वाटतो आणि पाहून असे वाटत नाही की या लोगोची थीम काय आहे.
9टू5गुगलनुसार भारतात हा काही यूजर्सला अपडेटद्वारे देण्यात आला आहे. सध्याच्या गुगल पे अॅपच्या खाली गुगल पे लिहिलेले असते, परंतु होम स्क्रीनवर नव्या आयकॉनजवळ जी पे लिहिलेले असेल.
मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर सुद्धा काही लोकांनी नव्या लोगोला ट्विट केले आहे. नवा लोगो गुगल पेच्या 116.1.9 (बेटा) व्हर्जनसोबत जारी केला जात आहे. लवकरच कंपनी गुगल पे च्या फायनल बिल्ड सोबत जारी करेल आणि तुमच्या स्क्रीनवर गुगल पे चा नवा लोगो असेल. मात्र, कंपनीने सध्या याबाबत काहीही म्हटलेले नाही.