बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था –
१)लष्कर, नौदल आणि हवाई दलातील अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं ( Retirement) वय वाढवण्याचा विचार(Disgruntled ) मोदी सरकारकडून ( Modi Government) सुरू आहे. यासाठी सरकारने नवीन प्रस्ताव(Disgruntled ) तयार केला आहे.
२) यामध्ये संरक्षण मंत्रालयाच्या ( Difence Ministery) अंतर्गत येणारा मिलिट्री अफेयर्स विभाग अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचं वय वाढवण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वयात निवृत्ती स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यात येणार आहे.
३) यामध्ये एखाद्या अधिकाऱ्याने निवृत्तीच्या वयाअगोदरच निवृत्ती स्वीकारली तर त्याच्या निवृत्ती वेतनात देखील कपात करण्यात येणार आहे. यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.
४) मात्र या नवीन तरतुदींवर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या नवीन प्रस्तावावर अंमलबजावणी झाल्यास याचा परिणाम थेट त्यांच्या निवृत्ती वेतनावर होणार आहे. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयात जाण्याची तयारीदेखील केली जात आहे.
५)मिलिट्री अफेअर्स विभागाचं नेतृत्त्व सीडीएस जनरल बिपिन रावत करतात. मिलिट्री अफेअर्स विभागानं २९ ऑक्टोबरला एक पत्र जारी केलं आहे. १०नोव्हेंबरपर्यंत बिपीन रावत यावर विचार करणार आहेत.
६) या नवीन प्रस्तावात लष्करातील कर्नल आणि नौदल, हवाई दलातील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांचं वय ५४ वरून ५७, ब्रिगेडियर आणि त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांचं वय ५६ वरून ५८, मेजर जनरल आणि त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांचं वय ५८ वरून ५९ वर्षे करण्यात येणार आहे.
७) यामध्ये महत्वाचे म्हणजे लेफ्टनंट जनरल आणि त्यावरील पदांसाठी मात्र कोणताही बदल नसेल. ज्युनियर कमिशंड ऑफिसर्स आणि लॉजिस्टिक्स, टेक्निकल आणि मेडिकल विभागात कार्यरत असणारे नौदल आणि हवाई दलातील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ५७ वर्ष करण्याचाही प्रस्ताव यामध्ये आहे.
८) यामध्ये वयाच्या अगोदर निवृत्ती स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात येणार आहे. यामध्ये २० ते २५ वर्षे सेवा देऊन निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना ५० टक्के पेन्शन मिळेल. तर २६ ते ३० वर्षे सेवा दिलेल्या अधिकाऱ्यांना ६० टक्के, ३१ ते ३५ वर्षे सेवा दिलेल्या अधिकाऱ्यांना ७५ टक्के आणि ३५ वर्षांहून अधिक वर्षे सेवा दिलेल्या अधिकाऱ्यांना पूर्ण पेन्शन मिळेल.
९) अनेक अधिकारी संधी मिळत नसल्याने आणि जागा कमी असल्याने अनेक अधिकारी लवकर निवृत्ती स्वीकारतात. अनेकजण विविध क्षेत्रात काम करण्यासाठी निवृत्ती स्वीकारतात.
१०)सैन्यात कित्येक वर्षे सेवा दिलेल्या अधिकाऱ्यांनी लवकर निवृत्ती स्वीकारल्यास सैन्याचं मोठं नुकसान होतं. त्याचा थेट परिणाम सैन्याच्या कार्यक्षमतेवर होतो.