नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्यासह आज बुधवारी चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today, 14 July 2021) सुद्धा वाढ नोंदली गेली. एमसीएक्स (MCX) वर 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 0.19 टक्के वाढ झाली. तर चांदीच्या दरात 0.03 टक्केची तेजी दिसून आली. आज ऑगस्ट डिलिव्हरीवाले सोने सुमारे 100 रुपयांच्या वाढीसह (Gold latest price) 47,981 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर ट्रेड करत आहे. याशिवाय जर चांदीबाबत बोलायचे तर तिच्या दरातसुद्धा आज किरकोळ तेजी आली आहे. Gold Price Today | rises 100 rupees per 10 gram silver also jump check today price
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
येथे चेक करा सोने-चांदीचे दर (Gold-Silver Price Today, 14 July 2021)
आज एमसीएक्स (MCX) वर ऑगस्ट डिलिव्हरीवाले सोने 0.19 टक्के वाढीसह 47,981 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. तर चांदी 0.03 टक्केच्या तेजीनंतर 69,100 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.
रेकॉर्ड हायपेक्षा अजूनही आहे स्वस्त
2020 च्या समान कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56191 रुपयांच्या उच्चतम स्तरावर पोहचला होता. आज सोने ऑगस्ट वायदा एमसीएक्सवर 47,981 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे, म्हणजे अजूनही सोने रेकॉर्ड हायपासून खुप स्वस्त मिळत आहे.
Web Title : Gold Price Today | rises 100 rupees per 10 gram silver also jump check today price
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update